जागेच्या वादातून तरुणाला संपवलं, भररत्यात दिवसाढवळ्या भयंकर कृत्य; नागपूर हादरलं.

 नागपुरात जागेच्या वादातून एका तरुणासोबत भयंकर घडलं असून या प्रकरणानंतर शहरात खळबळ माजली आहे. पोलीस याप्रकरणात पुढील तपास करत आहेत.नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रामनगर चौकात दिवसाढवळ्या हत्येची भयंकर घटना घडली आहे. भररस्त्यात उफाळून आलेल्या वादाला भीषण वळण लागलं. फुटपाथवर दुकान थाटण्यावरून झालेल्या वादातून भाजी विक्रेत्याने त्याच्या एका साथीदारासह गॅरेज चालकाची हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हत्येची ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या रामनगर चौकात भरदिवसा घडली. मृत ३७ वर्षीय विशाल निकोसे हा पांढराबोडी येथील रहिवासी आहे. तर आरोपींमध्ये किशन रमेश तिवारी आणि त्याचा मित्र निलेश सरोदे यांचा समावेश आहे. मृत विशाल हा गेल्या १८ वर्षांपासून रामनगर येथील फूटपाथवर गॅरेज चालवत होता, तर आरोपी किशन तिवारी हा गेल्या ७ वर्षांपासून त्याच्या शेजारी भाजीचं दुकान चालवत होता.गेल्या वर्षभरापासून दोघांचाही जागेवरून वाद सुरू होता. शुक्रवारी दुपारीही त्यांच्यात वाद झाला आणि याच वादातून किशनने त्याचा मित्र नीलेश याच्यासोबत मिळून लोखंडी रॉडने विशालवर हल्ला केला.

यात विशालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विशाल घटनास्थळी रक्तबंबाळ झाला आणि यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर रामनगर चौकात एकच खळबळ उडाली असून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांचं पथक आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी विशालला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. मात्र तेथे तपासादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या हत्येत सहभागी असलेल्या किशन तिवारीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर रामनगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.