वाळू माफियांना दणका! ५ बोटी जिलेटिनने उडविल्या, खडकपूर्णा प्रकल्पात महसूल विभागाची कारवाई.

रेतीतस्करांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी महसूल विभागाने अनेकदा कारवाया करूनही अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरूच असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली.खडकपूर्णा धरणातील रेतीतस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाच बोटी जिलेटिनच्या कांड्या लावून उडविण्यात आल्या. गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. रेतीतस्करांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी महसूल विभागाने अनेकदा कारवाया करूनही अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरूच असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली.खडकपूर्णा प्रकल्पामध्ये अधिक प्रमाणावर रेती आहे. धरणात पाणी असल्याने ही रेती सहज काढणे कठीण होते. हीच अडचण ओळखून धरणाच्या तळातून रेती उपसण्यासाठी तस्करांनी आधुनिक बोटींचा वापर सुरू केला आहे याविरुद्ध गुरुवारी दुपारी तीन वाजतापासून धरणात आणि काठालगत शोध मोहीम सुरू करण्यात आली. चिंचखेड शिवारात अवैध रेती उपसा करणाऱ्या तीन फायबर बोटी व दोन इंजिन बोटी अशा पाच बोटी पकडण्यात आल्या. किनाऱ्यावर आणून स्फोटकांद्वारे त्या उडवून नष्ट करण्यात आल्या. बोटी किनाऱ्यावर लावणे व त्यानंतर जिलेटिनच्या सहाय्याने उडविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीओ प्रा. संजय खडसे यांच्या नेतृत्वात विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी बोटी नष्ट करण्याची कारवाई केली.‘रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक थांबविण्यासाठी कारवाईचे सत्र सुरूच राहील. रेतीची वाहतूक करणाऱ्या अनेक टिप्परवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच धरणातही बोटींचा शोध सुरूच ठेवला जाणार आहे. कारवाईची ही मोहीम अजून व्यापक स्वरूपात राबविली जाईल, असे खडसे यांनी सांगितले.यापूर्वी बोटी उद्ध्वस्त करण्याच्या सातहून अधिक कारवाया करण्यात आल्या. आजपर्यंत २८ बोटी नष्ट करण्यात महसूल विभागाला यश आले आहे.

आधुनिक बोटींची किंमत २५ लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. या बोटी नष्ट झाल्या की, दुसऱ्या बोटी तत्काळ धरणात उतरविल्या जातात, असेही सूत्रांनी सांगितले.कारवाईकरिता प्रशासन धरणात उतरल्याचे पाहून अलर्ट झालेल्या रेतीतस्करांनी काही बोटी मराठवाडा हद्दीत जाफराबादकडे पळवून नेल्या. त्यामुळे त्यांना पकडणे अशक्य झाले. या प्रकारासंदर्भात जालना जिल्हा प्रशासनाला माहिती सांगण्यात आली. तर दुसरीकडे पाच ते सात बोटी खडकपूर्णा धरणाच्या तळाशी बुडविण्यात आल्या. कारवाई थंड झाली की, पुन्हा त्या बोटी काढून तस्करीला सुरुवात केली जाते. या बोटींवरही आता प्रशासन बारकाईने नजर ठेऊन आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.