आकाशवाणी चौकात ट्रकची दुचाकीला जबर धडक : महिलेच्या हाता-पायाचा झाला चुराडा !

उपचारासाठी दुचाकीवरुन येत असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला मागून येत असलेल्या लोखंडी अँगलने भरलेल्या ट्रकने धडक दिली. दुचाकीस्वार असलेल्या रागिणी चंपालाल पाटील (वय ४५, रा. साईनगर, भुसावळ) या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्यामुळे गंभीर जखमी झाल्या. ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा एक हात तुटून पडला होता तर पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडली. महामार्गावरील ही २४ तासातील दूसरी घटना घडल्यामुळे लोकप्रतिनिधींबद्दल रोष व्यक्त केला जात होता.

सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ येथे साई नगरात राहत असलेले चंपालाल पाटील हे सैन्यातून सेवानिवृत्त झालेले असून ते सद्या वरणगाव येथील औष्णीक विद्युत केंद्र येथे नोकरीस आहे. चंपालाल विद्युत पाटील व रागिणी चंपालाल पाटील हे दांम्पत्य भुसावळहून (एमएच १९, डीपी २४६७) क्रमांकाच्या दुचाकीने शहरातील खोटेनगर भागातील एका रुग्णालयात उपचारासाठी येत होते. सायंकाळी आकाशवाणी चौकात आल्यानंतर सिग्रल सुटलेला असतांना, चंपालाल पाटील हे सर्कलजवळून जात होते. मागून भरधाव वेगाने आलेल्या (सीजी ०४, एलडबल्यू १२९९) क्रमांकाच्या लोखंडी अँगल भरलेल्या ट्रकचा त्यांच्या दुचाकीला कट लागला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते दाम्पत्य खाली कोसळले. यावेळी रागिणी पाटील या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांच्या हातावरुन आणि पायावर ट्रक गेल्याने त्यांचा हात तूटून पडला तर पायाचा अक्षरशः

चेंदामेंदा झाला होता. तर चंपालाल पाटील हे किरकोळ जखमी झाले आहे.ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडल्याचे समजातच परिसरातील नागरिकांसह त्याठिकाणी नियुक्त असलेल्या वाहतुक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिकेतून रागिए रागिणी पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यव्यस्थ परस्थितीत उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून, महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. दाम्पत्याला चिरडलेल्या ट्रकस्ह चालकाला वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले. तो ट्रक जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.