बायऱ्या लढणाऱ्या, नवनिर्माण करणाऱ्या; जंगल, जमिनीसाठी वयाच्या ९२ व्या वर्षीही झिलाबाईंचा संघर्ष.

 मूळच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील झिलाबाई लग्नानंतर महाराष्ट्रात आल्या. १९७५ मधील प्रायव्हेट फॉरेस्ट ॲॅक्टने आदिवासींचा जंगल व जमिनीवरचा हक्क हिरावला गेला.सातपुड्यातील आदिवासींना त्यांच्या हक्काच्या वनजमिनी मिळायलाच हव्यात हा निर्धार मनाशी बाळगून संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या झिलाबाई वसावे वयाच्या ९२ वर्षीही अन्यायाविरोधात पेटलेला यज्ञ विझू देत नाहीत. आदिवासींच्या जंगल- जमिनीसाठी आंदोलन करणाऱ्या समाजसेविका मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे यांच्यापेक्षा दोन पावले पुढे राहून ‘आमू आखा एक से’, ‘बायऱ्या बायऱ्या लढणाऱ्या, नवनिर्माण करणाऱ्या’ या घोषणेतून आदिवासींच्या संघर्षाला नवी धार देत आहेत. भाषेची बंधने झुगारून त्या आदिवासी महिलांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच प्रेरणास्रोत बनल्या आहेत.सरदार सरोवर प्रकल्पामुळे उभे राहिलेले ‘नर्मदा आंदोलन’ हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. मेधा पाटकर आणि प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेल्या आंदोलनामुळे येथील आदिवासी जंगल आणि जमिनीवरचा हक्क आता कुठे परत मिळतोय.

मात्र, या आंदोलनात रायसिंगपूर संस्थेतील भराडीपादर गावातील झिलाबाई या आदिवासी महिलेचा संघर्ष दुर्लक्षितच राहिला. मूळच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील झिलाबाई लग्नानंतर महाराष्ट्रात आल्या. १९७५ मधील प्रायव्हेट फॉरेस्ट ॲॅक्टने आदिवासींचा जंगल व जमिनीवरचा हक्क हिरावला गेला.या कायद्याने जंगलातील मूळ निवासी आदिवासी हद्दपार होऊन आदिवासींचे हक्क नाकारल्यानंतर झिलाबाईंच्या संघर्षाला सुरुवात झाली. २००६ मध्ये थेट दिल्लीत संसदीय समितीसमोर धडक दिली. २०१० मध्ये नंदुरबार ते मुंबई अशी पदयात्रा काढून सरकारचे भान ठिकाणावर आणतात.

या लढ्यात त्यांचे पती गिमल्या वसावेंची मोलाची साथ होती. मात्र, गेल्या वर्षीच पतीचे निधन झाले. तरीही त्या खचल्या नाहीत. कुटुंब सांभाळून ९२ व्या वर्षी त्या लोकसंघर्ष मोर्चाच्या आंदोलनात सक्रिय असतात.आदिवासींना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी नंदुरबार, मुंबई, दिल्लीला जाऊन संघर्ष केला. त्यामुळे आदिवासींना कुठे वनहक्काच्या जमिनी परत मिळत आहेत. स्वातंत्र्यानंतरही शिक्षण, रोजगार, आरोग्यासाठी आदिवासींना लढावे लागत असल्याची खंत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.