थोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न. भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे दि एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण (ता. रावेर) संचालित डी. एस. देशमुख हायस्कूल, थोरगव्हाण येथे जागतिक महिला दिन (8 मार्च) क्रांतीज्योती सावितीबाई फुले व शजमाता जिजाऊ यांचे प्रतिमा पुजन व महिला शिक्षिका सौ एन डी पाटील यांचा सन्मान करून उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन प्रभारी मुख्याध्यापक डी. के. पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच एन. डी. पाटील मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
प्रभारी मुख्याध्यापक डी के पाटील यांनी विद्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून देत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास टी. पी. घुले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









