तिरंगा हॉटेलमध्येच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट, गोपनीय साक्षीदाराची साक्ष, महादेव मुंडे प्रकरणातही कराड कनेक्शन.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. हत्येच्या तपासात ५ गोपनिय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे ठरले असल्याचे बघायला मिळतंय. तिरंगा हॉटेलमध्ये नेमके काय घडले होते, हे आता गोपनिय साक्षीदारांच्या मदतीने पुढे आल्याचे बघायला मिळतंय.बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. सातत्याने धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आलीये. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. सीआयडीने आपल्या आरोपपत्रात एक नंबरचा आरोपी म्हणून वाल्मिक कराडचाच उल्लेख केला. यासोबतच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील काही धक्कादायक फोटोही पुढे आली. त्यातून हे स्पष्ट झाले की, संतोष देशमुखांची हत्या किती जास्त क्रूरपणे करण्यात आली.आता या हत्याप्रकरणात मोठी माहिती पुढे येताना दिसतंय. देशमुख हत्या प्रकरणात ५ गोपनिय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे ठरले आहेत. कराड, चाटे, घुले टोळीच्या दहशतीबाबत जबाबातून पुढे आलीये.

साक्षीदारांची नावे ही सुरक्षेच्या कारणामुळे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात ५ गोपनिय साक्षीदारांच्या जबाबामुळे मोठी मदत झालीये. यातील पहिला साक्षीदार हा तिरंगा हॉटेलमधील बैठकीच्यावेळी उपस्थित होता.तिथे नेमके काय संभाषण झाले, हे देखील सांगितले. तिथेच विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेची भेट झाली होती आणि तिथेच हत्येचा कट रचला गेला होता. आता दुसरीकडे परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाची कसून चौकशी करण्यात आली आहे. वाल्मिक कराडचा निकटवर्तीय श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याची दीड तास विशेष पथकाकडून चौकशी करण्यात आलीये. यामुळे या प्रकरणातही कराड संबंध जोडला जातोय.

महादेव मुंडे यांचा खून प्लॉटिंगच्या व्यवहारातून झाल्याचा संशय त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या प्रकरणात श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराडचा काही संबंध आहे का? हे तपासले जात आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थापन केलेल्या पथकाने ही चौकशी केली असल्याची माहिती मिळतंय. आतापर्यंत विशेष पथकाकडून महादेव मुंडे खून प्रकरणात 15 मुख्य संशयीतांची चौकशी झाली आहे. श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड परळी नगर परिषदेचे माजी पाणीपुरवठा सभापती आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.