मुंबईत एका हॉटेलमध्ये तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. तरुणाने आयुष्य संपवण्याआधी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.एका तरुणाने मुंबईतील लोकप्रिय हॉटेलमध्ये आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने आत्महत्येआधी एक सुसाइड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्याने दोन जवळच्या दोन लोकांची नाव लिहित आपल्या आयुष्याचा शेवट केला. या प्रकरणी तरुणाच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.मुंबईतील विले पार्ले येथील एका लोकप्रिय हॉटेलमध्ये ४१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. हॉटेलच्या खोलीत तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. निशांत त्रिपाठी असं तरुणाचं नाव असल्याचं समोर आलं आहे.










