जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील राजवड येथे उद्यापासून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन दोन दिवसीय असणार आहे दिनांक आठ मार्च व दिनांक 9 मार्च असे दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन पारोळा तालुक्यातील राजवड येथील माजी आमदार माननीय साहेबराव पाटील हे असणार आहेत. या अधिवेशनाला ॲड. राणीताई स्वामी, सारिकाताई नागरे, निर्मलाताई बुल्हें, सोना ताई शेख, सोनल ताई पाटील (जळगाव जिल्हाध्यक्ष महिला विभाग) हे स्वागताध्यक्ष पदी उपस्थित असणार आहेत.छत्रपती संभाजी नगर सिल्लोड, अजिंठा, फरदापुर, लातूर परभणी कोल्हापूर सोलापूर, सोयगाव व इतर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती या अधिवेशनाला असणार आहे. महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यातून सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव जिल्हाध्यक्ष महेश पाटील व महिला विभाग जिल्हाध्यक्ष सोनल पाटील, राहुल पाटील यांनी केले आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा अध्यक्ष महेश पाटील, राहुल पाटील, सोनाली पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे.

संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनाला उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. राजवड येथे पहिल्यांदाच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवंम ब्रिक्स मानव अधिकार मिशन च्या वतीने राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. पारोळा येथे झालेल्या बैठकीत अधिवेशन होणार असल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा लातूर यांनी अगोदरच केली बैठकीचे अध्यक्ष स्थानी प्रदेश निवड समिती अध्यक्ष अनिल देसले हे होते बैठकीत महाराष्ट्र प्रदेश ब्रिक्स मानव अधिकार राष्ट्रीय मिशनचे अध्यक्ष सुनील जाधव, राष्ट्रीय हितेश दाभाडे, जळगाव जिल्हाध्यक्ष महेश पाटील राहुल पाटील, सोनाली पाटील आधी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येथे ८ व ९ मार्च ला होणाऱ्या अधिवेशनात संघटनेचे सर्व कार्यकर्ते व उपस्थित राहून या अधिवेशनात संघटना वाढीसाठी व संघटनेचे ध्येय धोरणे व उद्दिष्टे हे स्पष्ट करण्यासाठी संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून पुढील भवितव्य व काही नियम यासंदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी या अधिवेशनाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन हे अधिवेशन राजवड या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. या अधिवेशनात संघटना वाढीसाठी व संघटनेच्या माध्यमातून विविध उपोषण व जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या वतीने लढा देऊन जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेच्या माध्यमातून पुरस्काराच्या रूपाने गौरविण्यात येणार आहे.









