सतीश भोसले याचा मारहाणी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे अनेक कारनामे पुढे येत आहेत. आता वन्यजीवप्रेमींनी त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.सतीश भोसले यांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात दिलीप ढाकणे यांच्या तोंडाचा जबडा फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्याला लंगडत चालावे लागत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने परिसरात दहशत निर्माण केली आहे. सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी असून आमदार सुरेश धस यांचा जवळचा व्यक्ती असल्याचे बोलले जाते.दरम्यान या अमानुष मारहाणी प्रकरणी सतीश भोसलेसहित ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आता सतीशचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे.










