पुण्यात एका पोलिस शिपायाचा वाढदिवसाचं अत्यंत जंगी असं सेलिब्रेशन करण्यात आलं. त्याच्या वाढदिवसाला भररस्त्यात केक कापण्यात आला. इतकंच काय तर या सेलिब्रेशनचं ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंगही करण्यात आलं.पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणण्याऐवजी गुन्हेगारीचे माहेरघर म्हणणायची वेळ आता आली आहे का? असंच म्हणावं लागेलं. पिंपरी- चिंचवड शहरात देखील असेच चित्र पहायला मिळत आहे. मात्र, याला चक्क एक पोलीस शिपाई अपवाद ठरला आहे. पिंपरी- चिंचवड आयुक्तालयाच्या पोलिस शिपायाने आपल्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या पोलिसाच्या वाढदिवसाला चार गुन्हेगार देखील उपस्थित असल्याचे समोर आले आहे.










