आई घरात, लेक चौथ्या मजल्यावर गेला अन् जोराचा आवाज… दिल्लीत IFS अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं.

 दिल्लीत एका आयएफएस अधिकाऱ्याने आपला जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अधिकाऱ्याने राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत सध्या काहीही माहिती नाही. दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चाणक्यपुरी परिसरात एका आयएफएस अधिकाऱ्याने इमारतीवरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. जितेंद्र रावत असे या आयएफएस अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र हे बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होते, असं पोलिसांनी सांगितलं.शुक्रवारी (७ मार्च) सकाळी सहा वाजता त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. जितेंद्र पडल्याचा आवाज येताच आजूबाजूच्या लोकांनाही धक्का बसला. ते धावत घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना जितेंद्र रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले.

जितेंद्र चाणक्यपुरी येथील एमईएच्या निवासी सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते, अशी माहिती आहे. त्यांच्या आई त्यांच्यासोबत राहत होत्या. जेव्हा त्यांनी इमारतीवरुन उडी घेतली तेव्हा त्यांची आई घरातच होती. या घटनेने त्यांच्या आईला मोठा धक्का बसला आहे. त्यांची पत्नी आणि दोन मुले डेहराडूनमध्ये राहतात. ते डिप्रेशनमध्ये असून आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशीही माहिती आहे.या प्रकरणाची माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या हे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते, अशी माहिती आहे. यापेक्षा अधिक माहिती मिळू शकली नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, असं पोलिसांनी सांगितलं. त्याशिवाय, पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या या टोकाच्या निर्णयाचं खरं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.चाणक्यपुरी येथे अनेक राजनैतिक मिशन आणि सरकारी निवासस्थाने आहेत. IFS ही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत एक राजनयिक सेवा आहे. पोलीस अधिकारी डिप्रेशनमध्ये का होते याचाही शोध घेत आहेत.भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकाऱ्याने चाणक्यपुरी भागात चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जितेंद्र रावत असे मृताचे नाव असून, वय ३५ ते ४० आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र डिप्रेशनने त्रस्त होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ते कशामुळे तणावात होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, ज्या डॉक्टरकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. जितेंद्रचा मोबाईलही तपासासाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. जितेंद्र हे IFS २०११ बॅचचे अधिकारी होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.