पुण्यातील पर्यटक अलिबागमध्ये बेलगाम, मद्यधुंद अवस्थेत कार चालवत वाहनांना धडक, पोलिसांशी वाद.

पुण्यातील पर्यटकांनी अलिबागमध्ये मद्यधुंद अवस्थेत कार चालवत इतर वाहनांना धडक दिली आहे. या अपघातानंतर पोलिसांशीही हुज्जत घातली आहे.अलिबाग हे राज्यातील पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. मुंबई पुणे या शहरांपासून हे पर्यटन स्थळ काही तासांवर असल्याने असंख्य पर्यटकांचा राबता असतो. पर्यटनाला येताना आनंद साजरा करताना मात्र अनेकदा या पर्यटकांना भान राहत नाही आणि त्यामुळेच अनेक चुकीच्या गोष्टी पर्यटकांकडून केल्या जातात. ज्याचा फटका स्थानिकांना होतो. अशीच एक घटना गुरुवार दि. ६ मार्चला अलिबागमध्ये घडली आहे. पुण्यातून आलेल्या पर्यटकांनी अलिबागमध्ये मद्यधुंद अवस्थेत कार चालवत वाहनांना धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे.पुण्यातून अलिबागमध्ये आलेल्या पर्यटकांनी अलिबागमध्ये धुडगूस घातल. त्यातील महिलेने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत जिल्हा रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिका आणि काही वाहनांना धडक दिली. ज्यात वाहनाचे नुकसान झाले. तसेच कारमधील प्रवाशांनी स्थानिक आणि पोलिसांशी वाद घातला.

त्यांच्याविरोधात नियमांचे उल्लंघन करत वाहन चालवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी कारची तपासणी केली. कारमध्ये काही दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. या कारमधील पर्यटकांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे.कारमधून काही पर्यटक हे अलिबागमध्ये फिरण्यासाठी आले होते.पर्यटकांच्या कारने जिल्हा रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला तसेच शहरातील इतर वाहनांनी धडक दिली. पुढे त्यांनी रेवदंडा बायपासवर अजून एका वाहनाला धडक दिली. यामध्ये वाहनांचे नुकसाने झाले आहे. मद्यधुंदी अवस्थेत कार चालवल्यानं पर्यटकही जखमी झाले आहेत.

दरम्यान या पर्यटकांनी उलटा स्थानिकांशी आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याचा प्रकारही समोर आला आहे.माहिती मिळताच दुपारी दीड दोनच्या सुमारास पोलिस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.पर्यटकांच्या नियम तोडून धाब्यावर बसवण्याच्या घटना वारंवार अलिबागमध्ये घडत आहे. तसेच अनेकदा पर्यटकांकडून बेशिस्त वर्तन केले जाते ज्यामुळे स्थानिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागतो. पर्यटक किनाऱ्यावर अस्वच्छता करतात ज्यामुळे किनारेही प्रदुषित होतात. पर्यटकांच्या अशा वर्तनाला नियंत्रण घालणे आवश्यक असल्याची भावना अलिबागकर नेहमीच व्यक्त करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.