राज्यातील कारागृहात ५०० कोटींचा घोटाळा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा आरोप.

कारागृहांमध्ये एका वर्षांत रेशन, उपाहारगृह आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.राज्यातील कारागृहांमध्ये एका वर्षांत रेशन, उपाहारगृह आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. ‘तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता आणि पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणीही त्यांनी केली.राज्य सरकार राज्यातील कारागृहात कैद्यांच्या पालनपोषणासाठी वर्षाकाठी शेकडो कोटी रुपये खर्च करते. रेशन आणि उपाहारगृहांमधून कारागृहातील कैद्यासाठी गहू, तांदूळ, साखर, डाळी, दूध, फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, अंडी, बेकरी पदार्थ खरेदी केले जातात.

ही खरेदी दर वाढवून करण्यात आल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. यावेळी शेट्टी यांनी अन्नपदार्थांचे बाजारांतील दर आणि कारागृहाने खरेदी केलेले दर यांची जंत्री सादर करून हा शेकडो कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला. या प्रसंगी ॲड. योगेश पांडे आणि बापू करंडे उपस्थित होते.केंद्रीय पद्धतीने खरेदी करताना साहित्याचे दर वाढविलेले असून, मंत्रालय आणि इतर उपाहारगृहांमध्ये खरेदी करण्यात येणारे साहित्य आणि कारागृहातील खरेदी करण्यात आलेल्या साहित्यातील दरांमध्ये मोठा फरक आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा गैरव्यवहार झाला आहे. या संदर्भात तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी शेट्टी यांनी केली.‘शक्तिपीठ महामार्गाला केवळ शेतकऱ्यांचा विरोध नाही. या रस्त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा कापला जाणार आहे.

नागपूर ते रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग चांगला असताना त्याला समांतर शक्तिपीठ महामार्ग का बांधला जात आहे ? राज्यातील प्रसिद्ध देवस्थानांकडे जाणारे रस्ते चांगले असताना ८०२ किलोमीटरच्या ८६ हजार कोटी रुपयांच्या या रस्त्याची आवश्यकता काय,’ असा प्रश्न राजू शेट्टी यांनी केला.’शक्तिपीठ महामार्गाला केवळ शेतकऱ्यांचा विरोध नाही. या रस्त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा कापला जाणार आहे. नागपूर ते रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग चांगला असताना त्याला समांतर शक्तिपीठ महामार्ग का बांधला जात आहे ? राज्यातील प्रसिद्ध देवस्थानांकडे जाणारे रस्ते चांगले असताना ८०२ किलोमीटरच्या ८६ हजार कोटी रुपयांच्या या रस्त्याची आवश्यकता काय,’ असा प्रश्न राजू शेट्टी यांनी केला.राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना दुसरीकडे अशी उधळपट्टी सुरू आहे. तीन वर्षे ठिबक सिंचनसाठी पैसे नाहीत. विद्यार्थ्यांच्या तीन वर्षाच्या ३४०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्त्या रखडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी या प्रकरणांत लक्ष घालावे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.