स्वारगेट आगारातील मुलीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांना..

 स्वारगेट आगारात एका २६ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गाडे हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर काही गुन्हे अगोदरच दाखल आहेत. पोलिसांकडून सध्या गाडेची चाैकशी सुरू आहे.पुण्याच्या स्वारगेट आगारात एका २६ वर्षीय मुलीवर बंद शिवशाही बसमध्ये चक्क अत्याचार करण्यात आला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आणि विरोधकांनी थेट सरकारवर निशाणा साधला. काही तास प्रयत्न करून पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. मुलीवर अत्याचार करण्याच्या अगोदर तो काही तास स्वारगेट आगारातच रेंगाळत होता. त्याने मुलीला गोड बोलून फलटणची बस दुसरीकडे लागल्याचे सांगितले.बंद शिवशाही बसमध्ये त्याने मुलीवर दोनदा अत्याचार केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

नराधम दत्तात्रय गाडे याच्याबद्दल सातत्याने धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. त्याचे अनेक कारनामे पुढे येत आहेत. तो चक्क एसटी आणि पीएमपी स्थानकामध्ये पोलिसाच्या वेषात फिरत. हेच नाही तर त्याचे पोलिसाच्या वेषातील फोटोही पुढे आले. तो बसस्थानकात थांबलेल्या मुलींना टार्गेट करत असल्याचीही माहिती पुढे आली.आता नुकताच आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबद्दल एक माहिती पुढे येतंय. आरोपी हा पोलिस चाैकशीमध्ये पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देतोय. गुन्हे शाखेने गाडेची तीन तास चाैकशी केली. मात्र, गाडे हा पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

दत्तात्रय गाडे हा लष्कर पोलिस ठाण्याच्या कोठडीत आहे. मात्र, तो पोलिसांना चाैकशीसाठी सहकार्य करत नसून सातत्याने फक्त उडवाउडवीचे उत्तरे देत आहे.आरोपीच्या वकिलांनी या प्रकरणाबद्दल धक्कादायक खुलासा केला. त्यांनी म्हटले होते की, दत्तात्रय गाडे आणि त्या मुलीची ओळख अगोदरपासून होती. आरोपीने तिला पैसेही दिले. त्यानंतर या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले. मात्र, या दाव्यानंतर वकिलांनी मोठा युटर्न घेत म्हटले की, असे आम्ही नाही तर गाडे बोलतोय. स्वारगेट अत्याचाराच्या प्रकरणानंतर राज्यात महिला आणि मुली सुरक्षित नसल्याचा प्रश्न परत एकदा उपस्थित झाला. मुंबईतही पाच नराधमांनी १२ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.