पाण्यावरुन लोकल प्रवाशावर कोयत्याने हल्ला; कर्जत-खोपोली दरम्यानची थरारक घटना, नेमकं काय घडलं.

आपल्याकडे दुसरी बाटली नसल्याचे सांगताच त्या प्रवाशाला राग आला आणि त्याने थेट आपल्या पिशवीतून कोयता काढून सहप्रवाशाच्या डोक्यावर वार केला.कर्जतहून खोपोलीला जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडे अन्य प्रवाशाने पाणी मागताच त्या प्रवाशाने आपल्याकडील पाण्याची बाटली त्याला दिली. थोड्या वेळाने त्याने पुन्हा पाणी मागितले असता, आपल्याकडे दुसरी बाटली नसल्याचे सांगताच त्या प्रवाशाला राग आला आणि त्याने थेट आपल्या पिशवीतून कोयता काढून सहप्रवाशाच्या डोक्यावर वार केला. दुसरा वार या प्रवाशाने हातावर झेलल्याने त्याचा जीव वाचला. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी अनोळखी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.कर्जत परिसरात इमारत बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करणारा मूळचा पश्चिम बंगालचा शेख माजील अली मजलूम शेख ( २३ ) मंगळवारी काम आटोपून रात्री ९ च्या लोकलने खोपोलीकडे जात होता.

लोकल लौजी स्थानकाजवळ पोहोचताच एका मद्यधुंद सहप्रवाशाने त्याच्याकडे पाणी मागितले. आपल्याकडील पाण्याची बाटली माजील याने त्याला दिली. या बाटलीतले पाणी संपताच त्याने दुसरी बाटली देण्यास सांगितले . मात्र, आपल्याकडे दुसरी बाटली नसल्याचे त्याने सांगताच नशेत असलेल्या त्या सहप्रवाशाला राग आला. त्याने आपल्याकडील कोयत्याने माजीलच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला केला.

मात्र, आणखी वार करण्याआधीच माजील याने कोयता वरच्या वर पकडून धरला .लोकल लौजी स्थानकात पोहोचताच रक्तबंबाळ अवस्थेत लोकलमधून उतरलेल्या माजील याला रेल्वे पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला. मात्र, आरोपी पळून गेला असून, सीसीटीव्हीच्या मदतीने त्याचा शोध सुरू असल्याचे कर्जत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक खाडे यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.