कांताई धरणातून मशिनरीच्या साह्याने प्रचंड वाळु उपसा ; एरंडोल महसूल विभागाच्या वतीने दुसऱ्यांदा चाऱ्या खोदून रस्ते केले बंद.

वाळू माफियांनी कांताई धरणाकडे मोर्चा वळवल्याने कांताई धरणाच्या पाण्यातून दहा ते बारा मशनरी च्या साह्याने रात्रंदिवस प्रचंड प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे तसेच नदी किनाऱ्यावर वाळू उपसा करणाऱ्या मशनरी ठेवण्यासाठी संपूर्ण किनारा परिसराला सपाट करून नदीचे नैसर्गिक सौंदर्य विकृत करण्याचा प्रकार राज रोसपणे सुरू असल्याने एरंडोल महसूल विभाग च्या वतीने तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या आदेशान्वये नदी किना किनाऱ्याकडे जाणारे रस्ते दुसऱ्यांदा खोदून वाळू वाहतूक बंद करण्यात आली आहे यापूर्वीही महसूल विभागाच्या वतीने नदी किनाऱ्याकडे जाणारे रस्ते खोदून अवैध वाळ वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता . मात्र वाळू माफियांकडून महसूल विभागाचे पथक जातात वाळु माफिया रस्ते बुजून पुन्हा अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसत असते .तहसीलदार प्रदीप पाटील यांचे आदेशान्वये दुसऱ्यांदा नदी किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठे खड्डे करून अवैध वाळू वाहतूक बंद करण्यात आली यावेळी तलाठी नितीन पाटील, कोतवाल जितेंद्र बडगुजर कढोली सरपंच किरण ननवरे हे उपस्थित होते. मात्र काही तासातच वाळू माफिया केलेले खड्डे जेसीबीच्या सहाय्याने बुजून नेहमीप्रमाणे नदीतून राजरोसपणे चोरटी वाळू होत असते.

त्यामुळे महसूल विभागाने वाळ उपसा कायमस्वरूपी थांबवण्याचे मागणी होत आहे वाळू काढण्यासाठी मशनरीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने गिरणा किनाऱ्यावरील पाळधी, पिंपळकोठा बुद्रुक,, खेडी कढोली, सावदा, पिंपळकोठा प्रचा या ठिकाणी जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या येथे असलेल्या विहिरींना फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे
दिवसा व रात्रीतून शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा :– कांताई धरणाच्या बाजूला नदीकिनारी ठेवण्यात आलेल्या मशनरी या अर्धा ते पाऊण तासात एक ब्रास वाळू काढत असते त्यामुळे या मशनरी दहा ते बारा तासात शेकडो ब्रास वाळू काढत असल्याने महसुल विभागाचे उत्पन्न तर बुडत आहेच त्याचबरोबर नदी किराणा किनारा जेसीबीच्या सहाय्याने मशिनरी ठेवण्यासाठी विकृत केल्यामुळे नदीचे सौंदर्य बिघडण्यासह भविष्यात जलसंकटही ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे अवैध वाळू उपशासाठीआजी माजी सरपंचाचा सहभाग :- वाळूचा लाडू खाण्यासाठी गावातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावाचे कारभारींचाच सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे गिरणेला वाचवणार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मात्र महसूल विभागाकडून कडक कारवाईची मागणी केली जात आहे .तहसीलदार प्रदीप पाटील एरंडोल नदी किनार्या कडे जाणाऱे रस्ते जेसीबीच्या साह्याने दुसऱ्यांदा महसूल विभागाच्या वतीने खोदण्यात आले आहे वाळू माफियांनी बंद रस्ते बुजल्यास यापुढे कडक कारवाई करण्यात येईलअवैध वाढू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्ते जेसीबीच्या साह्याने खोदताना तलाठी नितीन पाटील कोतवाल जितेंद्र बडगुजर सरपंच किरण नन्नवरे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.