सतीश भोसलेवर सुरेश धसांचा आर्शिवाद?, नवीन कारनामे उघड, गाडीवर चढून पाडला पैशांचा पाऊस.

 सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता सतीश भोसलेच्या क्रूर मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाली आहेत. तक्रारीनंतर अखेर भोसले याच्यावर गुन्हा दाखल झालाय. मात्र, तो अजूनही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आता सध्या सतीश भोसले याचे अजून काही कारनामे पुढे येताना दिसत आहेत.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस हे चांगलेच आक्रमक होताना दिसले. त्यांनी अनेक गंभीर आरोप केली. आता सुरेश धस हेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता सतीश भोसले याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अत्यंत क्रूरपणे तो मारहाण करताना दिसतोय. हैराण करणारे म्हणजे त्याचे दोन व्हिडीओ व्हायरल झाली आहेत. आता सतीश भोसले याचे एक एक व्हिडीओ पुढे येताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये तर तो चक्क गाडीवर चढून पैशांची उधळण करताना दिसतोय.

दिलीप ढाकणे, महेश ढाकणे यांना क्रूरपणे मारहाण करताना सतीश भोसले व्हिडीओमध्ये यापूर्वी दिसला. तोच सतीश भोसले गाडीवर चढून चक्क पैशांची उधळण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठलचा आहे, हे कळू शकले नाहीये. मात्र, तो नोटा उधळताना दिसत आहे. शिरूर कासार तालुक्यामधील बावी येथे १९ फेब्रुवारी रोजी हरणाची शिकार करण्यास जाळी लावली होती. दीपक ढाकणेच्या वडिलांनी शिकारीस अडथळा केल्यामुळे सतीश भोसले आणि त्यांच्या साथीदारांनी बावी येथील या पिता-पुत्रास मारहाण केली. दीपकला बॅटने अमानुष मारहाण केली आणि महेश ढाकणे यांचे तब्बल सात ते आठ दात पाडले.याबद्दल बोलताना हा व्हिडीओ जुना असल्याचा दावा हा सुरेश धस यांनी केला. आता सतीश भोसले याचे अनेक व्हिडीओ पुढे येताना दिसत आहेत.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सतीश भोसले याच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली. मात्र, तो अजूनही फरार आहे. सुरेश धस यांच्या आर्शिवादानेच हा सतीश भोसले सर्व चुकीचे काम करत असल्याचे सांगितले जात आहे. सुरेश धस आणि सतीश भोसले यांचे अनेक फोटो व्हायरल झाली आहेत.हेच नाही तर सतिश भोसले हा सुरेश धस यांनाच आपला बॉस मानतो. या प्रकरणावर अंजली दमानिया या चांगल्याच आक्रमक होताना दिसत आहेत. त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. दुसरीकडे सुरेश धस यांनी मान्य केले की, सतिश भोसले याला मी ओळखतो आणि तो कधी कधी माझ्याकडे येतो. पण तो माझ्या मागे काय करतो हे थोडी मला माहिती. सतीश भोसले याच्या व्हायरल होणाऱ्या फोटोनंतर त्याच्यावर टीका केली जात आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.