विद्यार्थी क्रिकेट किट ठेवायला गेला अन् अत्याचाराला बळी पडला, शाळेतील सेवकाचे घृणास्पद कृत्य; नांदेड हादरले.

शैक्षणिक क्षेत्रातही लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असून ही विद्यार्थ्यांसाठी चिंतेंची बाब ठरत आहे. नांदेडमधून अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शाळेतील सेवकाने चौथीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली.शैक्षणिक क्षेत्रातही लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असून ही विद्यार्थ्यांसाठी चिंतेंची बाब ठरत आहे. नांदेडमधून अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शाळेतील सेवकाने चौथीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. शहरातील नामवंत अशा ज्ञानमाता विद्या विहार शाळेत गुरुवारी दुपारी प्रकार घडला आहे. पीडित विद्यार्थ्याने घटनेची माहिती आपल्या आई वडिलांना दिली. त्यानंतर त्याच्या पालकांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

साबसिंग मच्छल (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, नांदेड शहरातील मालटेकडी बायपास रोडवर ज्ञानमाता विद्याविहार इंग्लिश माध्यमाची शाळा आहे. ही शाळा नामवंत असून हजारो विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात. याच शाळेत ५० वर्षीय साबसिंग मच्छल हा सेवक म्हणून काम करतो. गुरुवारी दुपारी शाळा सुटण्यापूर्वी चौथीत शिकत असलेला १० वर्षाचा विद्यार्थी शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळल्यानंतर त्याने क्रिकेटची कीट स्टोर रूममध्ये ठेवण्यासाठी गेला असता सेवकाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. शाळा सुटल्यानंतर एका महिला शिक्षिकेला तो बालक घाबरलेल्या अवस्थेत रडत असल्याचे निदर्शनास आले. शाळा सुटल्यानंतर त्याने आपल्या आईला घटनेची माहिती दिली.तर संतापलेल्या आई-वडिलांनी तात्काळ विमानतळ पोलीस ठाणे गाठले आणि सेवकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नराधम सेवक साबसिंग मच्छल याला अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर यामध्ये आणखी कोणी सामील आहे का, आरोपीवर याआधी गुन्हे दाखल आहेत का? याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सुशीलकुमार नायक यांनी दिली आहे.दरम्यान, शाळेत जो कोणी स्टाफ आहे त्याचे कॅरेक्टर वेरिफिकेशन करावे आणि त्यांना जवाबदारीची जाणीव करून द्यावी, जेणेकरून अशा घटना होणार नाहीत, असे आवाहन पोलीस उपाधीक्षक सुशीलकुमार नायक यांनी शाळेच्या संचालकांना केले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.