शिवशाहीत धक्कादायक प्रकार, २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग, संशयिताला लोकांकडून चोप, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीचा बसमधीलच प्रवास करणाऱ्या तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घडली. या संशयितास लोकांनी चौप दिला आहे. पोलिसांनी अटकेची कारवाई केली.पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाहीत एका तरुणीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच याच बसमध्ये विनयभंगाची घटना समोर आली. पुणे ते सांगली असा शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीचा बसमधीलच प्रवास करणाऱ्या तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घडली. पोलिसांनी संशयित वैभव वसंत कांबळे (वय ३४ रा. दुधारी मारुती मंदिर जवळ, वाळवा) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.दरम्यान, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. बस स्टँडवर आल्यानंतर तरूणीनीने याबद्दल माहिती चालकाला आणि पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत संशयितास पकडले, चोपत त्याला पोलिस ठाण्यात आणले.

यावेळी डायल ११२ आणि गस्ती पथक तत्काळ दाखल झाले होते. पीडितेने याबाबतची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका गावामध्ये राहणारी २४ वर्षीय तरूणी पुण्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने राहत आहे. ही पीडित तरुणी काल स्वारगेट ते सांगली या शिवशाही बसमधून गावी जाण्यासाठी सांगलीला येत होती.यावेळी इस्लामपूर जवळ संशयित वैभव कांबळे हा बसमध्ये चढला. तरूणीच्या मागील बाजूल असणाऱ्या सीटवर तो बसला होता. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बस आष्टा बस स्थानकातून सांगलीकडे येत असताना संशयित कांबळे हा वारंवार खिडकी जवळून पीडितेला स्पर्श करून अश्लील चाळे करू लागला.

रात्रीची वेळ असल्याने पीडिता भयभीत झाली होती. साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवशाही बस ज्यावेळी सांगली स्थानकात आली असता पीडितेने घडलेला प्रकार चालकासह तेथील पोलिसांना सांगितला.मात्र संशयित तेथे नव्हता त्याने तेथून पळ काढला होता. त्वरीत पोलिसांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी चांगलाच चोप पोलिसांसह नागरिकांनी दिला. पीडितेचे वडिलही त्याठिकाणी आले. त्यांनीही अत्यंत संताप व्यक्त केला. अखेर रात्री उशीरा संशयिताविरोधात गुन्हा नोंद करत अटेकेची कारवाई करण्यात आला. शहर पोलिस अधिक तपास करत आहे

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.