जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक देणे ,प्रत्येक बाबतीत आर्थिक व्यवहार करणे ,कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरणे. या विरोधात विविध संघटना सह महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात आंदोलन पुकारले होते अखेर या आंदोलनाला यश आले असून जिल्हा शल्य चिकित्सक याची बदली करण्यात आली आहे .

यामुळे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनाच्या सदस्यांनी आनंद साजरा केला आहे. महिना पासून विविध आदिवासी सह डॉक्टर संघटना ,परिचारिका संघटना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन पुकारले होते. शेवटी संघटनांचा आंदोलनाला यश आले असून जिल्हा चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांची जळगाव जिल्हातील धरणगाव येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.डॉ. वर्षा लहाडे यांच्याविरुध्द चौकशी समिती नेमण्यात आली होती त्याच्या अहवालानुसार प्राप्त तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने प्रशासकीय कारणास्तव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांची बदली करण्यात आली आहे.यामुळे आज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना च्या सदस्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आनंद साजरा केला व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या बदलीचे स्वागत केले यावेळी .महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांचे अध्यक्ष मनिषा वळवी, सुषमा गावीत, सरिता गावीत ,दुर्गा पाडवी,शोभा पाडवी, अन्नू पाडवी, सुर्वाती गावीत, निर्मला राउत, प्रशांत सर, जितेंद्र चव्हाण , ललिता वसावे ,मेट्रोन निलीमा वळवी तसेच सर्व अधिपरिचारिका व जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते….









