मुंबईची कोणतीही एक भाषा नसून अनेक भाषा आहेत. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीनं मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही, असं विधान करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते यांनी वाद ओढवून घेतला आहे.मुंबईची कोणतीही एक भाषा नसून अनेक भाषा आहेत. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीनं मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही, असं विधान करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते यांनी वाद ओढवून घेतला आहे. त्यानंतर विरोधकांनी जोशींना लक्ष्य केलं. जोशींनी माफी मागण्याची मागणी झाली. त्यानंतर जोशी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या विधानामुळे गैरसमज झाल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे.’मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झालेला आहे, असं मला वाटतं. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राचाच भाग आहे. त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. भारताचं आपलं एक वैशिष्ट्य आहे की इथे विविध भाषा बोलणारे लोकसुद्धा परस्परांना बरोबर घेऊन चालतात. त्यात कुठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही. हे जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे, असं संघाचे वरिष्ठ पदाधिकारी असलेले जोशी म्हणाले.










