सुरेश धसांना बॉस बोलणाऱ्या सतीश भोसलेचा करेक्ट कार्यक्रम, पोलिस ॲक्शन मोडवर, काय घडलं?

सुरेश धसांना बॉस बोलणाऱ्या सतीश भोसलेचा करेक्ट कार्यक्रम, पोलिस ॲक्शन मोडवर, काय घडलं?बीडमधील शिरूर परिसरात एका व्यक्तीला बॅटच्या साह्याने बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती घेतली असून, तपासात मारहाण करणारी व्यक्ती सतीश भोसले असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळ अद्याप निश्चित झालेले नसले तरी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून सतीश भोसलेविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला अमानुषपणे बॅटच्या साह्याने बेदम मारहाण करण्यात आली याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल झाला. यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रभर संतापाची लाट पाहायला मिळाली.

बॅटच्या साह्याने मारहाण करणारा व्यक्ती भाजपाचा पदाधिकारी सतीश भोसले असून त्याच्यावरती आता पोलीस ठाण्यामध्ये ३२४, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे, स्वतः पोलीसांनी फिर्यादी होऊन सुमोटो नुसार खटला दाखल केला आहे. फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा अकराच्या दरम्यान हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भाजप पदाधिकारी सतीश भोसले याचा शिरूर पोलीस शोध घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी संतोष देशमुखांची अमानुषपणे हत्या केल्याचे फोटो प्रसारमाध्यांवर प्रसारित झाले होते. हे फोटो पाहून राज्यभर संतापाची लाट तर उसळलीच पण, मन हेलावून टाकणाऱ्या फोटोंमुळे हळहळही व्यक्त केली गेली. या गोष्टीला काहीच दिवस होत नाहीत तोवर, बीडमधील शिरूर परिसरात एका व्यक्तीला बॅटच्या साह्याने बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती घेतली असून, तपासात मारहाण करणारी व्यक्ती सतीश भोसले असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळ अद्याप निश्चित झालेले नसले तरी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पीडित व्यक्ती अद्याप सापडलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीच्या अटकेसाठी पुणे आणि अहिल्यानगर येथे पथक रवाना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन सतीश भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक गणेश धोकरट यांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.