माळी समाज महासंघाच्या चेंज रिपोर्टरला आव्हान फेटाळले. पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटीलमहाराष्ट्र माळी समाज मा संग ही संस्था पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहे 1 एप्रिल 2021 रोजी या संस्थेचा चेंज रिपोर्ट तत्कालीन असिस्टंट चारिटी कमिशनर राहुल चव्हाण यांनी मंजूर केला होता या चेंज रिपोर्टरला काही मंडळींनी विरोध केला व रंजनी सागर (सह आयुक्त) यांच्या कोर्टात अपील दाखल केले होते
त्यांनी लक्षपूर्वक तपासणी करून दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेत चेंज रिपोर्टरला दिलेल्या आवाहन फेटाळले हे आव्हान देणाऱ्यांना वेळ देऊ नही त्यांनी कुठलाही पुरावे न दिल्याने अपील फेटाळण्यात आली वकील डी.डी. शहा यांनी प्रतिवादींच्या वतीने काम पाहिले महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या अध्यक्षपदी अनिल महाजन यांची निवड नियमानुसार असल्याच्या निकालावर पुन्हा कोर्टाने शिक्का मार्तब केले आहे
सन 2018 मध्ये पुणे सहाय्यक धर्मादायक आयुक्त यांच्याकडे 11 विश्वस्त यांच्या निवडीच्या चेंज रिपोर्ट सादर करण्यात आला होता परंतु काही मंडळींनी विरोध दर्शवला होता अनिल महाजन यांची समाज कार्यसाठीची धडपडीची खातर जमा करून व साक्षी नोंदवून नाशिक येथील वार्षिक सभेचे इतिवृत्त व पुरावे तपासून न्यायालयाने तक्रार अर्ज फेटाळून लावला त्यावेळी राहुल चव्हाण यांनी हा चेंज रिपोर्ट मंजूर केला होता









