भीषण! भूमिगत मॅग्नीज खाणीचा बोगदा खचला; दोघांचा मृत्यू, काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती.

 भंडाऱ्यातील चिखला येथील मॅग्नीज खाणीचा बोगदा खचला आहे. या भीषण दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी आहेत.भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या चिखला येथील भूमिगत मॅग्नीज खाणीचा बोगदा खचल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाने तत्काळ बचाव कार्य हाती घेतले असून, अद्याप काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना बुधवारी सकाळी सुमारे ९ ते ९:३० वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. चिखला मोइल वर्टीकल दोनच्या भूमिगत लेव्हल ३ मध्ये १०० मीटर खोलीवर पहिल्या शिफ्टचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. यामध्ये चार कामगार अडकले होते. प्रशासन आणि खाण व्यवस्थापनाच्या वतीने तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.या दुर्घटनेत विजय नंदलाल (वय ५०, रा. खरपडी तिरोडी) आणि अरुण जीवनलाल चोरमार (वय ४१, रा. सीतासांगवी) या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.

त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर शंकर सहदेव विश्वकर्मा आणि अजून एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर भंडारा आणि तुमसर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अद्याप दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, ते जिवंत आहेत की मृत, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि खाण व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
खाणीत सुरक्षितता नियमांचे पालन करण्यात काही त्रुटी होत्या का, याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटनांकडून केली जात आहे. प्रशासनाच्या वतीने अद्याप अडकलेल्यांचा शोध सुरू असून, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी केली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.