महिलेची तीन वर्षीय चिमुकल्यासोबत विहिरीत उडी, ‘ती’ काळरात्र ठरली; घटनेने हळहळ.

महिलेने तिच्या ३ वर्षांच्या चिमुकल्यासोबत विहिरीत उडी घेत आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका आईने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी मारल्याची घटना समोर आली आहे. या चिमुकला आणि महिलेच्या अशाप्रकारे जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह पोलिसांनी विहिरीबाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी ते पाठवण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, गावात राहणाऱ्या पती – पत्नीमध्ये नेहमी काही ना काही कारणांनी वाद होत होते. महिलेचा पती दररोज नशेत घरी येत होता. या घटनेच्या दिवशीही पती नशेत घरी आला आणि त्याने पत्नीसोबत वाद घातला. त्यानंतर तात्काळ महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलाला उचचलं आणि लेकासह विहिरीत उडी घेत आपलं आयुष्य संपवलं. महिलेने उडी मारल्याची घटना इतर मुलांनी महिलेच्या कुटुंबीयांना दिली. पण रात्री उशिरा ही घडल्याने महिला आणि तिच्या मुलाला वाचवता आलं नाही.

झारखंडमधील खुंटी येथील सावडा गावात ही धक्कादायक घटना घडली.पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितलं, की ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सूचना मिळताच पोलीस सावडा गावात पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढले. या महिलेबद्दल ग्रामस्थांकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी ग्रामस्थांनी सांगितलं, की मृत महिला आणि तिचा पती दोघंही नशेत असायचे आणि यातून वाद होत होते. पोलिसांनी महिलेच्या आत्महत्येनंतर तिच्या पतीला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे.ग्रामस्थांनी सांगितलं, की महिलेची मानसिक स्थिती ठिक नव्हती.

ती दिवसभर नशेत असायची. या पती – पत्नीला तीन मुलं आहेत. त्यापैकी तीन वर्षाच्या मुलाला घेऊन तिने विहिरीत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.दरम्यान, पती – पत्नीच्या या दररोजच्या वादात त्यांच्या चिमुकल्याला मात्र नाहक त्रास आपला जीव गमवावा लागला. महिलेने उचलेल्या या टोकाच्या पावलाने एकच खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.