आईने धर्म बदलला, नंतर पोटच्या मुलावरही धर्मपरिवर्तनाचा दबाव; अल्पवयीन मुलासोबत भयंकर घडलं.

मध्यप्रदेशातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. येथील एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईवडिलांनीच जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाब आणल्याचा दावा केला आहे. मध्यप्रदेशातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. येथील एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईवडिलांनीच जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाब आणल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात मुलाने एक व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याने हा दावा केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी त्या मुलाला बंधनातून मुक्त केले आहे. पण त्याच्या आईने मात्र धर्मपरिवर्तन करण्याचा दावा फेटाळला आहे.पीडित मुलगा हा मध्यप्रदेशतील खंडवा येथील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. पतीच्या जाण्यानंतर त्याच्या आईने रउफ शाह याच्याशी लग्न केले. राणीला दोन मुले आहेत. तर रऊफ याचीसुद्धा राणीशी झालेले दुसरे लग्न होते. लग्नानंतर राणीने धर्मपरिवर्तन केले आणि इस्लाम धर्म स्वीकारला. यानंतर तिने पीडित मुलाला तिच्या घरी बोलावले.

तर व्हिडिओमध्ये पीडित मुलाने असा दावा केला आहे की, त्याच्या आईने त्याला बांधून ठेवले. उपाशी आणि तहानलेल्या अवस्थेत सोडले आहे, मारहाण देखील केली आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले आहे. ‘कृपया मला वाचवा’ असा आर्जव देखील तो करत आहे.पीडित मुलाने असेही सांगितले की, माझ्या आईने एका मुस्लीम व्यक्तीशी लग्न करुन मला त्याच्या स्वाधीन केले आहे. दोघेही मला जबरदस्तीने मुसलमान बनवणे इच्छुक आहेत. मला बेल्टने मारहाण करण्यात येत आहे. दोन दिवस खायला-प्यायला ही देत नाहीत.

दरम्यान पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले तेव्हा तेथे पीडित मुलगा त्यांना साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत दिसला. यासंदर्भात पोलिसांनी त्याच्या आईला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मुलगा खूपच खोडकर आहे आणि वाईट संगतीत देखील अडकला आहे. त्याला वळण लावण्यासाठी आम्हाला त्याला बांधून ठेवावे लागले आहे.आईने असेही सांगितले की, तिचा मुलगा धार्मिक संघटनांच्या प्रभावाखाली आला होता आणि पोलिसांकडून वारंवार चौकशी केल्यामुळे आमचे कुटुंब तणावाखाली होते. यामुळे या प्रकरण किचकच असल्याचे दिसते.पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी व्हिडिओची दखल घेतली आणि तात्काळ अल्पवयीन मुलाची सुटका केली. अल्पवयीन मुलाने केलेल्या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी याप्रकरणी सखोल चौकशी केली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.