बारावीची परीक्षा दिली, काहीच दिवसात विद्यार्थिनीने केली आयुष्याची अखेर, रत्नागिरी हळहळलं.

 रत्नागिरी येथे बारावीच्या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. तिने हे टोकाचं पाऊल का घेतलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही.अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये लहान सहान गोष्टींवरुन टोकाचं पाऊल उचलण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अशीच एक दुर्दैवी घटना कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे घडल्याची माहिती समोर आली आहे. चिपळूण येथे नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अल्पवयीन मुलीने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत सध्या काहीही माहिती नाही, तिने आपला जीव का दिला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.रत्नागिरीतील चिपळूण शहरातील डीबीजे महाविद्यालयातून इयत्ता बारावीची परीक्षा दिलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला.

ही खळबळजनक घटना सोमवारी (३ मार्च २०२५) तालुक्यातील सती येथे उघडकीस आली आहे. ही अल्पवयीन विद्यार्थिनी आपल्या कुटुंबीयांसोबत सती येथे वास्तव्यास असल्याची माहिती आहे. याबाबत चिपळूण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.शहरातील डीबीजे महाविद्यालयात ही विद्यार्थिनी बाराव्या वर्गात शिकत होती. तिने आताच बारावीची परीक्षा दिली होती. अल्पवयीन विद्यार्थिनीचं कुटुंब हे मूळचे उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे. हे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून सती येथे वास्तव्यास राहत आहेत.

या विद्यार्थिनीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर तिने राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याची दोर कापली.अल्पवयीन विद्यार्थिनीने अशा प्रकारे आपल्या आयुष्याची अखेर केल्याची ही घटना उघडकीस आल्यानंतर चिपळूण शहरात एकच खळबळ माजली. घटनेनंतर तात्काळ या घटनेची माहिती पोलिस स्थानकात देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. या विद्यार्थिनीने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचा पाऊल उचललं याबाबत सध्या काहीही माहिती नाही. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश महाडिक करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.