ऊन वाढले; बाष्पीभवनही वाढले, भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता.

छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून रोज १.८० दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ होत आहे, ही मोठी समस्या बनली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत चालले आहे, ज्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणातून दररोज १.८० दशलक्ष घन मीटर पाण्याची वाफ होत आहे, अशी माहिती सूत्रांनी मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला पंधरा दिवस जेवढे पाणी लागते तेवढ्या पाण्याची एकाच दिवसात वाफ होत आहे. उन्हाचा चटका जसजसा वाढेल तसतसे बाष्पीभवनाचे प्रमाण देखील वाढेल असे सूत्रांनी सांगितले. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचे प्रमाण चांगलेच वाढू लागले आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या धरणात गतवर्षी याच वेळी २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा पाणीसाठ्याचे प्रमाण ६६ टक्के आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे धरण भरून वाहू लागले. त्यामुळे धरणात पाण्याचा साठादेखील समाधानकारक आहे. धरणातील एकूण पाणी साठ्यापैकी १८४ दशलक्ष घनमीटर पाणी छत्रपती संभाजीनगर शहरासाठी राखून ठेवण्यात आले आहे.संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे दररोज १.८० दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. ज्यामुळे पाणीसाठ्यात मोठी घट होताना दिसत आहे.

पुढील काही दिवसांमध्ये ऊन अधिक वाढणार हे तर स्पष्टच आहे. यादरम्यान बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणात होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जास्त नक्कीच आहे.छत्रपती संभाजीनगर शहराला पंधरा दिवसांसाठी जेवढे पाणी लागते तेवढ्या पाण्याचे एकाच दिवसात बाष्पीभवन होत आहे. एप्रिल, मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक असते. त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणदेखील वाढेल असे मानले जात आहे. उन्हाचा चटका जसजसा वाढेल तसतसे बाष्पीभवनाचे प्रमाणदेखील वाढेल. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरूवातीला प्रशासनाकडून सांगण्यात आले होते की, यंदा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने पाणीटंचाई नसले. मात्र, सध्याची परिस्थिती बघता भविष्यात पाणीटंचाई निर्माणत होण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.