मुंबईत १२ वर्षाच्या मुलीवर ५ नराधमांकडून अत्याचार, मोठी खळबळ, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.

मुंबईत जोगेश्वरी परिसरात १२ वर्षीय मुलीवर ५ आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झालीये. पुण्यातील स्वारगेट आगारातील मुलीच्या अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईतील जोगेश्वरी परिसरात पाच नराधमांनी मिळून एका १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केलाय. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळतंय. आरोपींवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार करण्यात आला आहे.

अत्याचारानंतर आरोपींनी मुलीला दादर परिसरात आणून सोडले असल्याची माहिती आहे.यासोबतच या अत्याचाराप्रकरणी मोठी माहिती पुढे येताना दिसतंय. आरोपी हे एसी मेकॅनिक असल्याचे कळतंय. लैगिंक अत्याचारानंतर मुलीला दादर परिसरात आरोपींनी सोडले. मुलीला एकटे पाहून आरोपींनी तिला घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. दादर परिसरात मुलगी फिरत असताना पोलिसांचे तिच्यावर लक्ष गेले आणि पोलिसांनी तिची चाैकशी केली असता तिने घडलेला सर्वप्रकार पोलिसांना सांगितला.त्यानंतर आरोपीची शोधाशोध सुरू झाली. मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या पाच जणांकडून अधिकची माहिती ही घेतली जातंय. या आरोपी आणि मुलीची ओळख अगोदरच होती का? याबद्दलही पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे. मात्र, या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय.परत एकदा राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बघायला मिळतंय. स्वारगेट आगारात एका २६ वर्षीय मुलीवर सराईत गुन्हेगाराकडून अत्याचार करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून धक्कादायक खुलासा होताना दिसत आहेत. मुंबईतही मुली सुरक्षित नसल्याचे यावरून आता दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचार वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..