धारावीत चिरीमिरी घेणारे ४ पोलिस निलंबित; कारवाई टाळण्यासाठी फेरीवाल्यांकडून घेतले पैसे.

धारावी पोलिस ठाण्यातील चार पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एकाच वेळी चौघांना निलंबित करण्यात आल्याने मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच कारवाई टाळण्यासाठी पोलिस त्यांच्याकडून ‘चिरीमिरी’ घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारवाई टाळण्यासाठी फेरीवाल्यांकडून पोलिस पैसे स्वीकारत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. याची गंभीर दखल घेत पैसे घेणाऱ्या धारावी पोलिस ठाण्यातील चार पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एकाच वेळी चौघांना निलंबित करण्यात आल्याने मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे.मुंबईत ठिकठिकाणी बेकायदा फेरीवाले ठाण मांडून बसतात.

महापालिका आणि पोलिस कर्मचारी या फेरीवाल्यांकडून पैसे घेत असल्याने कारवाई करीत नाहीत असा आरोप केला जातो. धारावी परिसरातही बेकायदा फेरीवाल्यांचा सुळसुळाट आहे. धारावी पोलिस ठाण्यातील पोलिस फेरीवाल्यांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. कारवाई न करण्यासाठी पोलिस हे फेरीवाले, रस्त्यावर खानावळ चालविणाऱ्यांकडून पैसे घेताना दिसत होते.समाजमाध्यांवरील हा व्हिडीओ वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्याची गंभीर दखल घेण्यात आली. या व्हिडीओची पडताळणी केली असता डिसेंबरमध्ये हे सर्व घडल्याचे समजले. धारावी पोलिस ठाण्यातील बीट मार्शल आणि मोबाइल वाहनावरील पोलिसांचा यात समावेश होता.

प्राथमिक चौकशीमध्ये पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र पुजारी, काशिनाथ गजरे, गंगाधर खरात, आप्पासाहेब वाकचौरे हे चौघे दोषी आढळले. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका या चौघांवर ठेवण्यात आला व त्यांचे निलंबन करण्यात आले.प्रलंबित शासकीय काम करून देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ७५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ठाणे भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक व भूकरमापक यांना बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. चांगदेव मोहळकर (उपउधीक्षक), श्रीकांत रावते (भूकरमापक) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार दिली होती.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..