टोकाचा निर्णय घेत १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, कपड्यांत चिठ्ठी आढळली अन् कारण समजलं.

विद्यार्थिनीचे शवविच्छेदन करताना अंगावरील कपड्यात सुसाइड नोट आढळून आली आहे.याप्रकरणी मुख्याध्यापकासह शिक्षिकेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्यात मुख्याध्यापक व शाळेच्या अधिक्षिका यांना अटक केली आहे.शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य निवासी शाळेतील आठवीच्या १३ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना १ मार्च रोजी समोर आली होती. सदर विद्यार्थिनीचे शवविच्छेदन करताना अंगावरील कपड्यात सुसाइड नोट आढळून आली आहे.याप्रकरणी मुख्याध्यापकासह शिक्षिकेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्यात मुख्याध्यापक व शाळेच्या अधिक्षिका यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मोहीदा येथील एकलव्य मॉडेल स्कूलच्या आठवीत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली होती. शाळेच्या इमारतीचे काम सुरु असल्याने सध्या ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपुर येथील आश्रमशाळेच्या आवारातच भरत होती. याठिकाणी मुलींच्या वसतीगृहातील एका खोलीत मयत मुलीने एका हुकाला स्वतःला लटकवून घेत आत्महत्या केली आहे. मयत मुलगी ही धडगाव तालुक्यातील अट्टी या गावची मुळ रहिवाशी होती. सकाळी तिच्या मैत्रीणींनी खोली उघडल्यानंतर हा प्रकार समोरआत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे शवविच्छेदन करताना तिच्या अंगावरील कपड्यात सुसाइड नोट आढळून आली होती. त्यात मुख्याध्यापकासह शिक्षिकेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी मयत विद्यार्थिनीच्या भावाच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलिस ठाण्यात मुख्याध्यापक विनोद कैलास पाटील व मयताची शिक्षिका अशा दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र शिक्षिका कोण असा प्रश्न उपस्थित झाल्याने चर्चेला उधाण आले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील आकांशा देवी ह्या स्त्री आधिक्षिकेला ताब्यात घेतले आहे. अधिक्षिका आकांशा देवी व मुख्याध्यापक विनोद कैलास पाटील यांना शहादा न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.