लायन्स क्लब नंदुरबार व नंदुरबार फेमिना क्लब तर्फे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

लायन्स क्लब नंदुरबार व नंदुरबार फेमिना क्लब तर्फे महिला दिन Beyond Boundaries’ ही थीम घेऊन विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या मध्ये सकाळचे सत्र युवकांसाठी तर दुपारचे सत्र फक्त महिलांसाठी असणार आहे. या मधील युवकांच सत्र उद्घाटन सकाळी 10 वाजता लायन्स डिस्ट्रिक 3234 H 2 चे डिस्ट्रिक गव्हर्नर PMJF ला. गिरीशजी सिसोदिया, जळगाव यांच्या शुभ हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, माजी खासदार डॉ. हिना गावित, माजी नगराध्यक्षा सौ. रत्नाताई रघुवंशी, उपप्रांतपाल ला. आश्विन बिजोरिय अकोला, उपप्रांतपाल ला. राहुल औसेकर, छत्रपती संभाजी नगर, रिजन चेयरपर्सन ला. योगेश मुंदंडा, अमळनेर, झोन चेअरपर्सन ला. शेखर कोतवाल, GAT को ऑर्डीनेटर वूमन अँड फॅमिली ला. सौ. सुप्रिया कोतवाल, युथ चेअरपर्सन ला. सौ पिनल शाह, लायन्स क्लब अध्यक्ष ला. शंकर भाई रंगलानी, फेमिना क्लब अध्यक्षा ला. मीनल म्हसावदकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे की नोट स्पीकर (मुख्य वक्ते) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते डॉ. संजय कळमकर, अहिल्यानगर आहेत. याचा लाभ शहरातील युवक युवती व खास करून स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महिला सत्र उद्घाटन दुपारी 2 वाजता करण्यात येईल. या कार्यक्रमात कर्तृत्वान महिलांचा सन्मान, मनोरंजनात्मक कार्यक्रमातात लोकगीते, भारुड, लावणी, स्थानिक महिला मंडळांचे वेगवेगळी थीम घेऊन समूह नृत्य, खेळ पैठणीचा, ई भरगच्च कार्यक्रम आहेत. तसेच नाट्यगृह परिसरातच मोफत आरोग्य शिबिर, महिलांच्या कलाकृती व खाद्य पदार्थाचे स्टॉल असणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमात सक्रिय होण्याचे आवाहन लायन फेमिना क्लब अध्यक्षा ला. मीनल म्हसावदकर सचिव ला. पूनम बेडसे, ट्रेझरर ला. दीपा वाडेकर, लायन्स क्लब अध्यक्ष ला. शंकर रंगलाणी, सचिव ला. दिनेश वाडेकर, ट्रेझरर ला. मनोज पोखरणा यांचे सह दोन्ही क्लब सदस्यांनी केले आहे.यावेळी लायन्स क्लब व फेमिना क्लब नंदुरबारच्या लायन्स सुप्रिया कोतवाल, मीनल मसावदकर, दीपा वाडेकर, अपर्णा पाटील, शेखर कोतवाल, दिनेश वाडेकर, राजेंद्र माहेश्वरी, राम दाऊदखाने, अनिक पाटील, राहुल पाटील इत्यादी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.