आरपीएफ परीक्षेचा पेपर ठरला शेवटचा, रेल्वेत चढताना आक्रित घडलं अन्.., हिंगोलीत दुर्दैवी घटना.

आरपीएफची परीक्षा देऊन येत असताना हिंगोलीतील स्थानकावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. रेल्वेत चढताना पाय घसरुन तो पडला आणि आक्रित घडले.हिंगोलीच्या माळसेलू रेल्वे स्थानकावर लघू शंकेसाठी उतरलेला युवक रेल्वे मध्ये चढताना पाय घसरून रेल्वे खाली येऊन त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे वाशिम येथील सोमनाथ गजानन रनवर वय वर्ष अंदाजीत (21)अस मयत युवकाच नाव आहे आरपीएफ ची परीक्षा देण्यासाठी गेला होता. मात्र परीक्षा देऊन येतानाच त्याचा दुर्देवी अंत झाला.वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला सोमनाथ हा आपल्या मित्रांसोबत आरपीएफ ची परीक्षा देण्यासाठी हैद्राबादला गेला होता. ही परीक्षा देऊन घरी परतण्यासाठी त्याने पूर्णा पॅसेंजर या गाडीतून प्रवास सुरू केला. सोमनाथ रेल्वेतून प्रवास करत होता. रेल्वेच्या बाथरुममध्ये दुर्गंधी येत असल्याने लघुशंकेसाठी त्याचा वापर न करता माळसेलू रेल्वे स्थानकावर गाडी काही काळासाठी थांबली होती.

तिथे खाली उतरला. मात्र तो खाली उतरल्यानंतर तात्काळ रेल्वे सुरू झाली हे पाहताच सोमनाथने गाडी पकडण्यासाठी धाव घेतली. मात्र रेल्वेमध्ये घाईघाईने चढत असताना अचानक रेल्वेच्या दरवाजाच्या पायरी वरून त्याचा पाय निसटला आणि थेट सोमनाथ रेल्वेच्या रुळावर पडला. हा प्रसंग त्यांच्या मित्रांच्या डोळ्यासमोर घडला त्यांनी आराडाओरड ही केली. मात्र क्षणात होत्याचं नव्हतं झालं होते. सेकंदातच रेल्वेखाली सोमनाथ अडकला होता. या भयंकर अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर माळसेलू स्थानकावर शोककळा पसरली होती.काही तासातच घरी पोहचणार होता आपल्या मित्रांसोबत हैद्राबादला आरपीएफ परीक्षा देण्यासाठी घरून मोठ्या आनंदात सोमनाथ गेला होता. आरपीएफची परीक्षा देखील दिली. पेपर झाल्यानंतर मित्रांसोबत गावाकडे निघाला असताना काही तासातच तो वाशिममध्ये असलेल्या आपल्या घरी पोहोचणार होता. मात्र त्याचवेळी अनावधानाने एक चूक घडली आणि आक्रित घडले.आणि नियतीने त्याला हिरावून घेतले.ही घटना घडलेली बघून सोबतच्या मित्रांना काय करावे हे कळेनाच झाले. मित्र रेल्वे अपघातात गेल्याच बघून अश्रू अनावर झाले आहेत. आता आम्ही सोमनाथच्या आई वडीलांना काय सांगावं अशी अवस्था त्यांची झाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.