बाथरुममध्ये गर्भवती महिला भयंकर अवस्थेत, घटनेने खळबळ; पती ताब्यात, काय घडलं?

गर्भवती महिला बाथरुममध्ये भयंकर अवस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.गर्भवती महिलेचा मृतदेह बाथरुममध्ये मिळाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. पतीने गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या केली अशी शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस याप्रकरणी हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये काजी मोहम्मदपूर भागात राहणारी डॉली कुमारीचा मंगळवारी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. डॉली गर्भवकी होती. ती राहत असलेल्या घरातच बाथरुममध्ये तिचा मृतदेह मिळाला.

सुरुवातीच्या तपासात गर्भवतीची गळा दाबून हत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डॉलीच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसंच पोलिसांनी डॉलीचा पती सिभेश चंद्र सिंह याला ताब्यात घेतलं आहे.डॉलीचं लग्न सिभेशशी सहा वर्षांपूर्वी झालं होतं. सिभेश हा कपडा व्यापारी आहे. सिभेशशी लग्नानंतर डॉलीला समजलं, की सिभेशचे लग्नाआधीच एका तरुणीशी प्रेमसंबंध सुरू होते. डॉलीसोबत लग्न झाल्यानंतरही त्याचे प्रेमसंबंध सुरुच होते. त्यावरुन दोघांमध्ये सतत वाद होत होते.त्याशिवाय याआधीही डॉलीचा गर्भपात झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. पतीनेच डॉलीची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याशिवाय पोलीस महिलेने आत्महत्या केली नाही ना? या बाजूनेही तपास करत आहेत.पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितलं, की महिला बाथरुममध्ये मृतावस्थेत पडलेली होती. महिला गर्भवती होती आणि प्राथमिक तपासात तिची गळा दाबून हत्या केल्याचं कळतं आहे. पतीवरील संशयावरुन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याशिवाय पोलीस सिभेशच्या प्रेयसीचाही या हत्येत काही हात आहे का? याचा तपास घेत आहेत. पतीशिवाय त्याच्या प्रेयसीचीही चौकशी केली जाऊ शकते. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.