सुशिला राम कदम प्राथमिक विद्यामंदिर येथे स्नेह संमेलन ( विविध गुणदर्शन ) कार्यक्रम संपन्न .भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरेवरणगांव श्रीनाथ एज्युकेशन द्वारा संचलित सुशीला राम कदम प्राथमिक विद्यामंदिर वरणगाव दिनांक 27/02/2025 रोज गुरुवार या दिवशी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप मधुकर चौधरी सेक्रेटरी किशोर रवींद्रनाथ झोपे जाँईन सेक्रेटरी सन्माननीय अमित रत्नाकर चौधरी संचालक बाळकृष्ण पोपट धनगर संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच गं.सां.चौधरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.आर.चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष सन्माननीय संदीप मधुकर चौधरी यांनी दीप प्रज्वलन व सरस्वतीच्या ,
नाथांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले मुख्याध्यापिका श्रीमती संगीता संजय चौधरी यांनी प्रास्ताविक मध्ये मुलांच्या सुप्त गुणांना व कलागुणांना वाव मिळावा तसेच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या अनुषंगाने शाळा सदैव प्रयत्नशील आहे. सूत्रसंचालन रेखा राम चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन . विजयकुमार प्रभाकर झोपे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.पालकांची मोठ्या संखेने उपस्थिती लाभली .









