शौचास गेलेल्या तरुणीला मारहाण करून अत्याचार, गडचिरोली पोलिसांकडून आरोपीला 24 तासात अटक.

तरुणीच्या अंगावर दगड आणि विटांनी हल्ला केल्याचे व्रण आढळले होते. तसेच तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याने ती बेशुद्ध पडली होती.शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलेली 23 वर्षीय तरुणी शौचास गेली असता तिला मारहाण करून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे. पीडित तरुणीच्या जबाबानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. अनिल संतू उसेंडी (23) रा. छत्तीसगड, हल्ली मुक्काम शिवणी असं आरोपीचे नाव आहे. आरोपीने त्याचा गुन्हा कबुल केला आहे.

गडचिरोलीतील शिवनी गावात ही घटना सोमवारी घडली होती. पीडित तरुणी गावाबाहेर उघड्यावर शौचास गेली असता आरोपीने तिला मारहाण करुन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला होता. त्यामुळे तरुणी बेशुद्ध पडली. बराच वेळ ती घरी परत न परतल्याने घरच्यांनी शोध घेतला असता, ती गावाबाहेर बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. त्यावेळी तरुणीच्या हाताला जखमा झाल्याचं दिसून आलं. तसेच तिच्या डोळ्याखाली दगड किंवा विटेने मारहाण केल्याचे व्रण होते. जखमी अवस्थेतील तरुणीला तातडीनेजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर पुढील उपचारासाठी तिला  हलवण्यात आले. तिच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. तसेच आरोपी हा गावातील आहे की गावाबाहेरील आहे याचा अंदाज येत नव्हता.

परंतु या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.दरम्यान, मंगळवारी युवती शुद्धीवर आल्यावर, जबाब नोंदवण्यासाठी सक्षम झाल्यानंतर तरुणीच्या जबाबावरुन आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीच्या अटकेसाठी पाच पथके रवाना करण्यात आली होती. जबाबादरम्यान तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरुन आरोपीचे रेखचित्र पोलिसांकडून तयार करण्यात आलं आणि त्या आधारे अनिल उसेंडीला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.