दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ.

 मुलीच्या कुटुंबीयांनी काही संशयितांची नावे पोलिसांना दिली असून पोलिसांची पाच पथकं ही मुलीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.राज्यभर महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत असताना आता अकोल्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातल्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झालं आहे. अकोल्यातल्या कृषी नगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून या 12 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याची माहिती आहे. या अपहरणाप्रकरणी अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पोलिस ठाण्यात अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे वंचित पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पोलिस ठाण्यात पोचले आहे. पोलिसांनी तातडीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. अपहरणाच्या या प्रकारामुळं अकोला शहरात आणि कृषी नगर परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान, मुलीच्या शोधार्थ सिव्हिल लाईन पोलिसांचे दोन पथक गठीत करण्यात आले असून मुलीच्या शोधात पथक रवाना झाले आहेत. अद्यापपर्यंत पाच ते सहा संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

अकोल्यातल्या कृषी नगर भागात असलेल्या गजबजलेल्या वस्तीतून मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास या 13 वर्षीय मुलीच अपहरण झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक बच्चनसिंग तसेच  जयवंत सातव यांच्याशी फोनवर चर्चा करून तातडीने मुलीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी काही संशयितांची त्यांची नावे पोलिसांना दिली आहेत. काही दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केल्या जात आहे. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तिथली पाहाणी पोलिसांनी केली असल्याची माहिती पोलिस अधिकारी जयवंत सातव यांनी दिली.

दरम्यान, अकोला शहर आणि परिसरात अल्पवयीन मुलींची छेडछाड तसंच अपहरणाचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पालक आणि मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांचा  पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक आणि वंचित आघाडीकडून होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.