कोपरगावात एकलव्य स्मारक बांधण्यासाठी तसेच आदिवासींच्या विविध प्रश्नासाठी अनोखे लक्षवेधी जागरण गोंधळ आंदोलन.
कोपरगाव तालुक्यामध्ये आदिवासी बहुजनांच्या हक्कासाठी लढणारे एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांच्या नेतृत्वाखाली काल कोपरगाव तहसील कार्यालय समोर हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये लक्षवेधी अनोखे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले याप्रसंगी कोपरगाव तालुक्यात आदिवासी समाज बांधव 50 हजारहून जास्त लोकसंख्येने असून देखील आजपर्यंत कोपरगाव शहरामध्ये एकलव्याचे स्मारक नाही ही खंत मंगेश औताडे यांनी व्यक्त केली तसेच, तसेच लोकप्रतिनिधी आमदार आशुतोष काळे यांनी मागील पंचवार्षिक रोजी आदिवासी समाज बांधवांना एकलव्य स्मारक बांधून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर समाज बांधवांनी आमदार काळे यांच्यावर विश्वास ठेवला होता परंतु या विश्वासाला तडा गेल्या सारखे वाट ल्यानंतर संपूर्ण कोपरगाव तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे
अशा देखील चर्चा आदिवासी समाज बांधवांमध्ये काल आंदोलन स्थळी चालू होत्या तसेच मंगेश औताडे म्हणाले की कोपरगाव तालुक्या मध्ये आदिवासी समाज बांधवांना प्रांत तहसीलदार यांनी तात्काळ, मोरवीस,वेळापूर, कारवाडी, हांडेवाडी, सुरेगाव, देरडे चांदवड पोहेगाव, मढी येथील सामाजिक प्रश्न तात्काळ मार्गे लावावे तसेच कोपरगाव तालुक्यामध्ये हजारो समाज बांधवांसाठी गाव पंचनामा करून जातीचे दाखले, रेशन कार्ड द्यावे, तसेच निराधार, श्रावण बाळ योजना वयोवृद्ध महिलांना पेन्शन योजना लागू करावी अश्या मागणीचे निवेदन मागील पंधरा दिवसा आधी देऊन देखील प्रश्न मार्गी न लागल्याने आंदोलन कर्त्यांमध्ये प्रशासनाविरोधात नाराज होती, या अनुषंगाने जोपर्यंत समाजाची प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे देखील मंगेश औताडे म्हणाले तर अवघ्या 5 तास चालणाऱ्या आंदोलनाला अखेर तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्या मध्यस्थीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेला बोलून आदिवासी बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्यात यश आले यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलप्रसंगी एकलव्य आदिवासी परिषदेचे बहुजन टायगर फोर्सचे हजारो समाज बांधव उपस्थित होते व मोठ्या संख्येने महिला पुरुष यांचाही समावेश यात होता.
तसे हे जागरण गोंधळ आंदोलन अतिशय आगळे वेगळे असल्या मुळे तालुका जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे याप्रसंगी आझाद समाज पार्टीचे राज्याचे नेते अमोल आहेर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच आंदोलनाला उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते महिला भगिनी यांचे आभार मंगेश औताडे यांनी मानले