लाथ मारली पाहिजे अशा मंत्र्यांना, ते विकृत.., मंत्री जयकुमार गोरेंवर संजय राऊत भडकले.

खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयकुमार गोरेंवर सडकून टीका करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी केली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील महिलेचा छळ आणि विनंयभंग केला आहे. ही माहिती अंत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळेही महाराष्ट्र कलंकित होतो. जयकुमार गोरे हे विकृत मंत्री आहेत. अशा मंत्र्‍यांना लाथ मारली पाहिजे अशी परखड टीका संजय राऊत यांनी केली आहे.संजय राऊत पुढे म्हणाले की, संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. आता हे पात्र पुन्हा निर्माण झाल आहे. फडणवीसांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पु्न्हा एकदा पिसले पाहिजे.

आणि सर्व मंत्र्‍यांची झाडाझडती घेतली पाहिजे.तसेच असे मंत्री असतील तर महिला अत्याचाराविरुद्ध, महिलांच्या सबलीकरणावर देवेंद्र फडणवीस कसे बोलणार आहे. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच हे प्रश्न मी अमित शाह यांच्याकडे पाठवणार असल्याचेही सांगितले. भाजप महिला आघाडीलाही त्यांनी लक्ष्य केले ते म्हणाले की मला आश्चर्य वाटत की भाजपच्या महिला मोर्चाच्या महिलांच फडफडणं कुठे गेले.धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की प्रकृतीचं उत्तम आहे. काल चुरू चुरू बोलत होते. त्यांनी जे ट्विट केले त्यात त्यांना संतोष देशमुख हत्येचा धक्का बसला नाही.

फडणवीसांनी राजीनामा द्या नाहीतर लाथ घालतो हे सांगितले आणि मग राजीनामा दिला आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला या प्रश्नावर राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले अजित पवारांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला पाहिजे. पंतप्रधानांनी त्यांच्यांवर आरोप केला आहे.महाराष्ट्रातला पैहलवान मंत्री विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. १० दिवस जेलची हवा खाऊन येतो. तसेच १० हजार रुपयांचा न्यायालयात दंड भरतो. आणि पुन्हा त्या महिलेला ब्लॅकमेल करायला लागतो. असे आरोप विजय वडेट्टीवार यांनी केले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.