ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. कार थेट एसटीमध्ये घुसली आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. कार थेट एसटीमध्ये घुसली आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ताम्हिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रेस्ट हाऊसच्या अलीकडे मंगळवारी, ४ मार्च रोजी दुपारी भीषण अपघात झाला. दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास एसटी बस आणि स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी, की खेड – चिंचवड ही एसटी बस पुण्याच्या दिशेकडे जात होती. तर स्विफ्ट कार विळे गावाच्या दिशेकडे येत होती. उतार आणि वेग असल्यामुळे तसंच गाडीवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट कार एसटी बसला समोर जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की यामध्ये स्विफ्टच्या चालकाच्या बाजूचा भाग बसमध्ये शिरून पूर्ण चेपला गेला आहे.

त्यामुळे कार चालक आणि चालकाच्या पाठीमागे बसलेली जेष्ठ महिला यांचा मृत्यू झाला. तसंच हे दोन्ही मृतदेह कारमध्येच अडकून पडले.सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी जाऊन त्यांनी आधुनिक साधनांच्या मदतीने दुपारी ३ वाजता अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु केलं. कार मधील तीन जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. जखमींमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे. तर एसटीमधील कोणीही जखमी झाले नाही.

अपघात झालेल्या कार मधील प्रवासी मुळशी तालुक्यातील शिंदेवाडी येथील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची नावं अद्याप समोर आली नाहीत. मात्र ते मुळचे उडीसा राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.अपघाताची माहिती मिळताच विळे दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड आणि पोलीस विनोद तांदळे घटनास्थळी पोहोचले. तसंच येथील तुषार कदम आणि राकेश दगडे यांनी देखील घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केलं. माणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे आणि पोलीस कर्मचारी हे देखील रेस्क्यू टीम सोबत घटनास्थळी पोहचलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.