एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत यवतमाळ शहरात तीन मुलांचे व दोन मुलींचे वसतिगृह आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहातच नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था राहत होती. नंतर जेवणाच्या दर्जावरून विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढल्याने सरकारने २०१६पासून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे सुरू केले. विद्यार्थी त्यांच्या पसंतीच्या खाणावळीतून जेवण घेऊ शकतो. यानंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारी कमी झाल्या. पण, आठ वर्षांपासून ३,७०० रुपये इतकाच निर्वाह भत्ता महिन्याला दिला जात आहे. महागाईच्या तुलनेत भत्ता वाढविण्यात न आल्याने विद्यार्थ्यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांना भेटून निवेदन दिले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी (पांढरकवडा) यांच्याकडेही व्यथा मांडली. कुणीही त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही.यावरून संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारी यवतमाळातील बिरसा मुंडा चौकात आंदोलन केले. यानंतर पांढरकवडाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर; ९५ किलोमीटर लाँग मार्च काढण्याचे जाहीर केले. मात्र मुलींच्या वसतिगृहातील वॉर्डनने बाहेरून कुलूप लावून विद्यार्थिनींना कोंडले. वसतिगृहाबाहेर पोलिसांनी बॅरिकेड लावले.एकही विद्यार्थिनी बाहेर पडणार नाही यावर लक्ष ठेवले गेले. परिस्थिती चिघळत असल्याचे दिसताच वॉर्डन व्ही. बी. तेलंगे यांनी प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांना माहिती दिली. त्यांनी आपण यवतमाळला चर्चेसाठी येत असल्याचे सांगितले. यानुसार मंगळवारी त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

