संशयाने संसाराची राखरांगोळी! पतीने गरोदर पत्नीला निर्घृणपणे संपवलं, नंतर गोदापात्रात फेकला मृतदेह, नाशिकमधील घटना.

 ​​अहिल्याबाई होळकर पुलाजवळून अमृता बेपत्ता झाल्याचा दावा तिच्या पतीने केला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.पतीने एकोणवीस वर्षीय पत्नीवर संशय घेत माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत तिचा खून करून चांदशीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गोदापात्रात मृतदेह फेकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ४) सायंकाळी उघड झाली. अमृता कुमारी विकीराय यादव (मूळ रा. सरलाई, नेपाळ) असे मृत महिलेचे नाव आहे.अहिल्याबाई होळकर पुलाजवळून अमृता बेपत्ता झाल्याचा दावा तिच्या पतीने केला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. याप्रकरणात मृत पत्नीच्या पतीला संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, मृत महिला गरोदर असूनही तिच्या पतीने हे दृश्यकृत्य केल्याने संताप व्यक्त केला.

आनंदवल्ली परिसरातून चांदशीकडे जाणाऱ्या नदी पात्रात मंगळवारी (दि.४) एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. नाशिक तालुका पोलिसांनी डॉक्टरांसह घटनास्थळी पोहोचून पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. मृतदेहाचे फोटो ग्रामीण पोलिसांनी शहर पोलिसांना पाठविल्यानंतर मृत महिलेशी मिळतेजुळते फोटो पंचवटी पोलिस ठाण्यात बेपत्ता असलेल्या महिलेच्या वर्णनाशी जुळले. त्यानुसार संबंधित महिलेच्या पतीला बोलावून तिचे कपडे व अंगावरील टॅटू दर्शवून ओळख पटविण्यात आली.

त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर पत्नीचा खून केल्याची त्याने कबुली दिली. त्याने ओढणीच्या सहाय्याने तिचा गळा आवळून खून करून मृतदेह झुडूपात टाकून पळ काढला. त्यानंतर पंचवटी पोलिस ठाण्यात जात पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती.दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मृत महिला व तिचा पती सातपूर परिसरात राहतात. पती बिगारी कामगार असून, पत्नीवर संशय घेत होता. २८ फेब्रुवारीपूर्वी त्याने पत्नीला गंगापूर रोडलगत नेत खून केल्याचे समजते. दरम्यान, मृत महिला गरोदर होती तरीही तिच्या पतीने हे दृश्यकृत्य केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.