पोलिसांनी तातडीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अपहरणाच्या या प्रकारामुळे अकोला शहरात आणि कृषी नगरपरिसरात खळबळ उडाली आहे. मुलीच्या शोधात सिव्हिल लाईन पोलिसांचे दोन पथकं गठीत करण्यात आली आहेत, मुलीच्या शोधात पथक रवाना झाले आहेत. आतापर्यंत पाच ते सहा संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.दरम्यान, माजी महिला नेत्या यांच्या नातीचं अपहरण झाल्यावर दुपारी तीन वाजता तक्रार देण्यासाठी गेले असता अपहरणाची तक्रार संध्याकाळी पाच वाजता घेण्यात आली.
त्यामुळे कुटुंबीय तसंच कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं असून आताही आंदोलन सुरुच ठेवलं आहे. आरोपीला ताबडतोब अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.त्याशिवाय शाळेच्या प्रशासनावरही त्यांनी आक्षेप घेत आरोप केले आहेत. शाळेतील प्राध्यापकांना याप्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार देण्याबाबत कुटुंबाने सांगितलं, मात्र शाळेतील प्राध्यापक हे गेले नाहीत. तसंच शाळेतील कर्मचाऱ्यांना मुलीला घरचे कोणीही आल्याशिवाय शाळेतून सोडायचं नाही, असं सांगितल्यावरही मुलगी शाळेतून बाहेर कशी आली? हा सवाल मुलीच्या कुटुंबाने शाळा प्रशासनावर उपस्थित केला आहे. पाच-सहा संशयितांची नावं पोलिसांना सांगितली असून शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

