डिलिव्हरी बॉयने ‘सर’ न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी; शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण,यवतमाळमध्ये संताप!

मोबाइलवरून संभाषण करतांना केवळ ‘सर’ न म्हटल्याच्या कारणावरून एका डिलेव्हरी बॉयला अश्लिल शिवीगाळ करण्यात आली. एवढेच नव्हे तर दमदाटी करीत त्याला मारहाण देखील करण्यात आली आहे.मोबाइलवरून संभाषण करतांना केवळ ‘सर’ न म्हटल्याच्या कारणावरून एका डिलेव्हरी बॉयला अश्लिल शिवीगाळ करण्यात आली. एवढेच नव्हे तर दमदाटी करीत त्याचा पत्ता विचारण्यात आला. शिवाय तो कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानात जात त्या डिलेव्हरी बॉयला बेदम मारहाण देखील करण्यात आलीय. भाईगिरीलाही लाजवेल असे हे कृत्य येथील वादग्रस्त ठाणेदाराने केले. पुढे आलेल्या माहितीनुसार, धिरज गेडाम रा.आर्णी असे मारहाण झालेल्या डिलेव्हरी बॉयचे नाव आहे. तो शहरातील सनराईज लॉजिस्टीक कंपनी नामक प्रतिष्ठानात कुरीअर आणि पार्सल पोहोचविण्याचे काम करतो.

त्यासाठी त्याला प्रति कुरीअर दहा रुपये मिळकत होते. नेहमीप्रमाणे तो त्याच्या प्रतिष्ठानात बसून ज्यांचे कुरीअर आले आहे, त्यांना कॉल करीत होता. असेच एका कुरीअरवर केशव ठाकरे असे नाव आणि मोबाइल क्रमांक नमूद होता. तेंव्हा त्या मोबाइलवर कॉल करीत धिरजने केशव ठाकरे बोलता का, अशी विचारणा केली. तेंव्हा ठाणेदार केशव ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला. केशव ठाकरे काय तुझा नोकर आहे का, कुणाशी बोलतोय तू तुला माहिती आहे का, मी इथंला ठाणेदार आहे, असे सांगत दमदाटीची भाषा केली.दरम्यान, त्यावर धिरजने या कुरीअरवर केवळ केशव ठाकरे नाव लिहीले आहे. पद वगैरे काहीच लिहीलेले नाही.

त्यामुळे व्हेरीफाय करण्यासाठी हा कॉल केल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा सर, साहेब म्हणण्याची काही पध्दत नाही का, तु कुठे आहे ते सांग, तुलाच व्हेरीफाय करतो,  असे म्हणत सज्जड दम दिला. शिवाय या संभाषणादरम्यान ठाणेदार ठाकरे यांनी अश्लिलतेचा कळस असलेली शिव्यांची लाखोळी अनेकदा वापरली. यावरच ते थांबले नाहीते तर चार पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घेऊन थेट त्याच्या प्रतिष्ठानात पोहोचले. तेथेही त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाणही केली. ठाकरे हे वादग्रस्त ठरले आहे. त्यानंतर आता डिलेव्हरी बॉयला मारहाणीचे हे त्यांचे कृत्य उघडकीस आल्याने त्यांच्याविरुद्ध जनक्षोभ वाढताच आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.