जळगावात क्रीडा महाकुंभात पारंपारिक खेळ स्पर्धेचे आयोजन; कबड्‌डी, लगोरी, लंगडी, लेझीम स्पर्धा.

जळगावात क्रीडा महाकुंभात पारंपारिक खेळ स्पर्धेचे आयोजन; कबड्‌डी, लगोरी, लंगडी, लेझीम स्पर्धा. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यावतीने १ ते ९ मार्चदरम्यान विभागीय क्रीडासंकुल येथे क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी जिल्हयातील शासकिय व अशासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांचे पारंपारिक जिल्हा क्रिडास्पर्धा महाकुंभ जिल्हा क्रिडासंकूल, जळगाव व बाहेती कॉलेज, जळगांव येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.स्पर्धेत जिल्ह्यातील अशासकीय आयटी आय २० संघ तसेच शासकीय आय टी आय १६ संघ सहभागी होणार आहेत.

भारतीय खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पुरुष व महिला गटात पंजा लढविणे ही वैयक्तिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर पावनखिंड दौड ही वैयक्तिक स्पर्धा विभागीय स्तरावर होणार आहे. सांघिक स्पर्धेमध्ये कबड्‌डी स्पर्धा महिला व पुरुष अशा गटात होणार आहे. फुगडी स्पर्धा सांघिक स्वरुपात होणार असून प्रत्येक संघात कमीतकमी ४ खेळाडू असणार आहेत.‘लंगडी स्पर्धेत पुरुष व महिला असे गट असतील. यात सात मिनिटांचा एक डाव असेल ९ जण खेळतील व तीन राखीव असा १२ जणांचा संघ राहणार आहे. तर विटी-दांडू स्पर्धा सांघिक स्वरुपात होणार असून महिला आणि पुरुष गटात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यात ९ जण खेळतील व ३ जण राखीव असतील. दोरीवरच्या उड्या ही स्पर्धा वैयक्तिक गटात खेळविली जाणार आहे. ३० सेकंदात सर्वात जास्त उड्‌या मारणाऱ्या स्पर्धकास विजयी घोषीत केले जाणार आहे. लगोरी खेळाची सांघिक स्पर्धा होणार असून ही स्पर्धा पुरुष व महिला गटात खेळविण्यात येणार आहे. आठ जण मैदानात तर दोन जण राखीव असतील. रस्सीखेच स्पर्धा सांधिक स्वरुपात होणार असून ८ जण मैदानात व २ जण राखीव अशी रचना असेल. जो संघ दोन डाव जिंकेल तो विजयी होणार आहे. खो-खो स्पर्धा महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात होणार आहेत. ९ जण व ३ राखीव असा १२ जणांचा संघ असेल. यात दोन डाव चौदा मिनिटांचे असतील. संघास सादरीकरणासाठी पाच मिनिटे मिळतील, वेशभूषा सुरुवात आणि सादरीकरणासाठी अतिरिक्त गुण असतील.

सांघिक लेझीम स्पर्धादेखील होणार असून प्रत्येक संघात कमीत कमी २४ खेळाडू असतील. संघास सादरीकरणासाठी ७ मिनिटे मिळतील तसेच वेशभूषा सुरुवात व सादरीकरण यासाठी अतिरिक्त गुण असतील. या स्पर्धेचे उ‌द्घाटन शासकीय अभियांत्रिकी वि‌द्यालय प्राचार्य गजरे यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमूख पाहुणे म्हणुन शासकीय तंत्र निकेतनचे डॉ पराग पाटील तसेच मनोज महाजन व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नवनीत चव्हाण, संस्थेच्या उपप्राचार्य राजश्री पाटील हे असतील .या कार्यक्रमाच्या आयोनाकरीता कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथील सर्व गटनिदेशक शिल्पनिदेशक व सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.