एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रकला लागलेली आग विझवण्यात यश आले. परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या काही काळानंतर हायड्राच्या साहाय्याने ट्रक बोगद्यातुन बाजूला घेऊन वाहतूक सुरु करण्यात आली.मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे एका केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीमुळे बोगद्यात काही काळ मोठ्या प्रमाणात धुर पसरला होता. मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरून विशाखापट्टणम ते तळोजा येथे लोखंडी रिंगांची वाहतुक करणारा MH 43 BX – 7967 या क्रमांकाचा ट्रक, चालक राहुल जायप्रकाश यादव (वय 27 वर्ष रा रोडपाली कळंबोली, मूळ रा. उत्तर प्रदेश )घेऊन जातं असताना तो बोरघाटात नवीन बोगद्यात आला. अचानक शॉर्टसर्किटमुळे ट्रकला आग लागली.सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र या आगीमुळे बोगद्यात मोठया प्रमाणात धूर पसरला होता. त्यामुळे बोगद्यात असलेल्या काही वाहनांंमधील प्रवाशांना तात्काळ बोगद्याबाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.










