देविका आणि सतीश एकाच सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. दोघेही एकमेकांना २ वर्षांपासून ओळखत होते. त्यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये गोव्यात थाटामाटात लग्न केलं होतं.हैदराबादमध्ये एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ वर्षीय देविका हिने २ मार्च रोजी रात्री तिच्या राहत्या घरात छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. हैदराबाद येथील रायदुर्गममधील प्रशांती हिल्स भागात हा प्रकार घडला आहे. टीव्हीच्या रिमोटवरुन आदल्या रात्री दाम्पत्यात वाद झाला होता, त्यानंतर पती घर सोडून निघून गेला, त्यानंतर सकाळी परतल्यावर पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याचा दावा.
या घटनेनंतर देविकाच्या आईने एफआयआर दाखल केला. जावई सतीश लग्नापासूनच देविकाला हुंड्यासाठी त्रास देत होता. या गोष्टीला कंटाळून लेकीने आत्महत्या केली, असा आरोप देविकाच्या आईने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे.देविका आणि सतीश एकाच सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. दोघेही एकमेकांना २ वर्षांपासून ओळखत होते. त्यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये गोव्यात थाटामाटात लग्न केलं होतं.रायदुर्गम पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत, देविकाच्या आईने म्हटले आहे की, देविकाच्या नावावर नोंदणीकृत असलेलं घर आपल्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी जावई सतीशने दबाव आणला होता. तसेच हुंड्यासाठी तो छळ करत होता.प्राथमिक तपासानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, २ मार्चच्या रात्री देविका आणि सतीश यांच्यात टीव्ही रिमोटवरून वाद झाला, त्यानंतर सतीश घरातून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत आला तेव्हा त्याला देविका मृतावस्थेत आढळली. यानंतर त्याने देविकाने गळफास घेतल्याचं कुटुंबीय आणि पोलिसांना कळवलं.रायदुर्गम पोलिसांनी पती सतीशविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे. देविकाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम उस्मानिया रुग्णालयात करण्यात आले.









