जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांची अखेर बदली ,मेग्मो संघटना,नसीॅग संघटना, आदिवासी संघटनाचा आंदोलनाला यश….

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक देणे ,प्रत्येक बाबतीत आर्थिक व्यवहार करणे ,कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरणे. या विरोधात मेग्मो संघटना सह डॉक्टर संघटना ,परिचारिका संघटना तसेच विविध आदिवासी संघटनांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात शासनाला निवेदन दिले होते. गेल्या महिनाभर विविध आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केले.

शेवटी वैद्यकीय अधिकारी व आदिवासी संघटनांचा आंदोलनाला यश आले असून जिल्हा चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांची जळगाव जिल्हातील धरणगाव येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.डॉ. वर्षा लहाडे यांच्याविरुध्द चौकशी समिती नेमण्यात आली होती .डॉ. वर्षा लहाडे, यांचेविरुध्द प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. योगेश चित्ते, सहायक संचालक (वैद्यकीय) आरोग्य सेवा, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समितीने दि. २४ जानेवारी २०२५ रोजी अहवाल सादर केला होता .सदर चौकशी समितीच्या अहवालानुसार प्राप्त तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने प्रशासकीय कारणास्तव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांची बदली करण्यात आली आहे. डॉ वर्षा लहाडे यांची झाल्याने जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा रुग्णालय, नंदुरबार या पदाचा तात्पुरता कार्यभार डॉ. कांतराव धोंडीबा सातपुते, अति. जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय, नंदूरबार यांचेकडे सोपविण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.