ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. कार थेट एसटीमध्ये घुसली आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.ताम्हिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रेस्ट हाऊसच्या अलीकडे मंगळवारी, ४ मार्च रोजी दुपारी एक दीड वाजताच्या सुमारास एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की खेड – चिंचवड ही एसटी बस पुण्याच्या दिशेकडे जात होती. तर स्विफ्ट कार विळे गावाच्या दिशेकडे येत होती. उतार आणि वेग असल्यामुळे तसंच गाडीवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट कार एसटी बसला समोर जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की यामध्ये स्विफ्टच्या चालकाच्या बाजूचा भाग बसमध्ये शिरून पूर्ण चेपला गेला आहे. त्यामुळे कार चालक आणि चालकाच्या पाठीमागे बसलेली जेष्ठ महिला यांचा मृत्यू झाला. तसंच हे दोन्ही मृतदेह कारमध्येच अडकून पडले.










