महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचे मार्फत बालस्नेही पुरस्कार २०२४, वितरण सोहळ्याचे आयोजन दि. ०३ मार्च २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित, मुलांचे निरीक्षणगृह । बालगृह, जळगांव या संस्थेचे अधिक्षक रविकिरण व्ही. अहिरराव यांना नाशिक विभागातून उत्कृष्ट परिविक्षा अधिकारी म्हणून सन २०२४ चा बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच संस्थेत कार्यरत काळजी वाहक . संजय जे. अहिरे यांना उत्कृष्ट काळजी वाहक प्रकारात सन २०२४ चा बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी मा. कु. अदिती तटकरे, मंत्री, महिला व बाल विकास विभाग, श्रीमती मेघना बोर्डीकर-साकोरे, राज्यमंत्री, पंकज भोयर, राज्यमंत्री, योगेश कदम, राज्यमंत्री, मा. श्री. मिलिंद देवरा, राज्यसभा खासदार, मा. श्रीमती. भावना गवळी, विधानसभा आमदार, मनिषा कायंदे, विधान परिषद आमदार, अश्वती दोर्जे, विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल प्रतिबंध विभाग, मा.अनुपकुमार यादव, सचिव, महिला व बालविकास विभाग, नयना गुंडे, आयुक्त, महिला व बालविकास विभाग,कैलास पगारे, आयुक्त एकात्मिक विकास प्रकल्प, सुशीबेन शहा अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, लक्ष्मण राऊत सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व सर्व सदस्य महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अॅड. श्रीमती. निलिमा चव्हाण, अॅड. संजय सेंगर, अॅड. प्रज्ञा खोसरे, अॅड. जयश्री पालवे, सायली पालखेडकर, चैतन्य पुरंदरे सदस्य उपस्थित होते व यांचे हस्ते सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.









